अपघाती मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांना १३ लाख भरपाई - कामगार न्यायालय

पुणे : अपघाती मृत्यूप्रकरणात मृताच्या पत्नीसह आईस नुकसान भरपाईची रक्कम सुपूर्त करावी. तसेच अल्पवयीन मुलांच्या नावांची रक्कम मुदत ठेवीमध्ये ठेवण्याचा आदेश कामगार न्यायालयाचे न्यायाधीश रोहिणी कुलकर्णी यांनी दिला

    संतोष मखर यांचे काम करत असताना अपघाती निधन झाले होते. ते काम करत असलेल्या कंपनीने कामगार न्यायालयात नुकसान भरपाईपोटी १३ लाख ७० हजार ६०७ रुपये जमा केले आहेत. ही रक्कम मिळण्याकरिता मखर यांची आई, पत्नी व मुलांनी अ‍ॅड. एस.

    एम. धनगर यांच्यामार्फत कामगार न्यायालयात अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने कागदपत्रे तपासून पत्नीस दोन लाख ७० हजार ६०७ रुपयांचा धनादेश देऊन उर्वरित दोन लाख रुपये त्यांच्या नावे तीन महिने मुदतीकरीता राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवावे. तर, अल्पवयीन असलेल्या दोन मुलांच्या नावे प्रत्येकी चार लाख रुपये कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत मुले सज्ञान होईपर्यंत ठेवावे. एक लाख रुपये मखर यांच्या आईस धनादेश स्वरूपात द्यावे, असा आदेश दिला आहे.

अपघाती मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांना १३ लाख भरपाई - कामगार न्यायालय : निकाल प्रत