कर्मचार्‍यांना दिला जाणारा वाहतूक भत्ता (Conveyance allowance) ईएसआय योगदानाच्या गणनेच्या उद्देशाने वेतनाचा भाग नाही - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कर्मचार्‍यांना दिला जाणारा वाहतूक भत्ता (Conveyance allowance) ईएसआय योगदानाच्या गणनेच्या उद्देशाने वेतनाचा भाग नाही असे निर्देश देणारे अंतर्गत परिपत्रक ESIC ने दि.०८/११/२०२१ जारी केले आहे.

ESIC VS. Texmo Industries (विशेष रजा याचिका (c) No.811/2021) यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय घेतला की कर्मचार्‍यांना दिलेला वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता यावर ESI योगदान लागू होणार नाही. वाहतूक भत्ता (Conveyance allowance) कर्मचार्‍यांच्या वेतनाचा भाग नाहीआणि आवश्यकतेनुसार भत्ता नियमितपणे किंवा मधूनमधून दिला जातो की नाही हे महत्त्वाचं नाही. भत्त्याचे स्वरूप आणि भत्त्याचा उद्देश संबंधित आहेत.

ESIC ने ज्या तारखेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता त्या तारखेपासून म्हणजेच 08 मार्च 2021 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, या तारखेपासून ESI योगदानाच्या उद्देशाने वाहतूक भत्ता आणि प्रवास भत्ता समाविष्ट करणे आवश्यक नाही.

कर्मचार्‍यांना दिला जाणारा वाहतूक भत्ता (Conveyance allowance) ईएसआय योगदानाच्या गणनेच्या उद्देशाने वेतनाचा भाग नाही - सर्वोच्च न्यायालय निकाल  : Click

कर्मचार्‍यांना दिला जाणारा वाहतूक भत्ता (Conveyance allowance) ईएसआय योगदानाच्या गणनेच्या उद्देशाने वेतनाचा भाग नाही - ESIC परिपत्रक  : Click