मुबिया ऑटोमॅटिक कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लि.(Mubea Automotive Components India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पिरंगुट : पिरंगुट औद्योगिक नगरीमधील मुबिया ऑटोमॅटिक कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लि.(Mubea Automotive Components India Pvt Ltd) या कंपनीमध्ये व्यवस्थापन व मुबीया एम्प्लॉईज युनियन दरम्यान सुरु असलेला वेतन वाढीचा करार हा नुकताच संपन्न झाला असून या करारा दरम्यान कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना १२७०० रुपये अशी भरघोस वेतन वाढ देण्यात आलेली आहे.

    संघटना व व्यवस्थापन यांच्यामध्ये जवळपास एक  वर्षभर चाललेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा वेतन करार नुकताच संपन्न झाला असून या करारा दरम्यान मुबिया एम्पलॉज युनियन मधील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ या तीन वर्षाच्या कालखंडासाठी ही  वेतन वाढ करण्यात आलेली आहे.

     या तीन वर्षासाठी झालेल्या करारादरम्यान १२७०० रुपये एवढी भरघोस वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली  आहे.या वेतनवाढी नंतर येथील कायम स्वरूपी  कामगारांचा पगार 60 ते ६२ हजार रुपयांच्या घरात पोहोचलेला आहे.

      या वेतन वाढीनंतर मुबिया एम्प्लॉईज युनियनच्या सर्व  कर्मचाऱ्यांनी झांज पथक तसेच डॉल्बी लावून गुलालाची उधळण करीत आपला आनंद साजरा केला

     हा वेतन करार यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या वतीने कंपनीचे मुख्य अधिकारी के.डी. सिंग,मुबिया इंडिया एच.आर.हेड  रमण गोवित्रीकर,प्लांट हेड दुसान,श्रीनिवासन महादेव,प्लांट मॅनेजर अविनाश दिवान,एच.आर.असिस्टंट मॅनेजर अतुल पिसाळ यांनी तर मुबीया  एम्प्लॉइज युनियन च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष किरण नागरे,जनरल सेक्रेटरी रामदास निवंगुणे,जॉ.जनरल सेक्रेटरी विष्णू गोडांबे,खजिनदार हनुमंत नागरे,सदस्य सागर बराटे व  कालिदास नागरे यांनी काम केले 

युनियन प्रतिनिधीला दिली दुचाकी गाडी भेट 

     मुबीया संघटनेचे युनियन प्रतिनिधी कालिदास नगरे यांनी या करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे सर्व कामगार बांधवांच्या वतीने त्यांना एक लाख पंधरा हजार रुपयाची दुचाकी गाडी भेट देण्यात आलेली आहे.त्यांना मिळालेल्या या  अनोख्या दुचाकी गाडी च्या भेट वस्तूची संपूर्ण पिरंगुट औद्योगिक नगरीमध्ये चर्चा सुरू आहे व त्यांचे व कामगारांचे कौतुक देखील होत आहे.

   त्याचप्रमाणे उर्वरित सर्व युनियन प्रतिनिधींना देखील एका रकमेचा धनादेश सर्व कामगार बांधवांच्या वतीने  देण्यात आला आहे.