पुणे : खेडसिटी येथील मार्स इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Mars International India Pvt.Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि मार्स इंटरनॅशनल इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये पहिला वेतनवाढ करार दि. 4 जानेवारी 2023 रोजी शांततामय, उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे :
करार कालावधी : कराराचा कालावधी तीन वर्ष असेल ( 1 मार्च 2022 ते 28 फेब्रुवारी 2025 )
B1 Level : एकूण सरासरी पगारवाढ Rs.16500/- ( Rs.14500 + 2 % ते 3 % performance Link increment On CTC ).
प्रथम वर्ष : रु.8900 /-
दुसरे वर्ष : रु.3700 /-
तिसरे वर्ष : रु.3900 /-
प्रथम वर्ष : 33.33%
दुसरे वर्ष : 33.33%
तिसरे वर्ष : 33.33%
फरक रक्कम : दि.1 मार्च 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.
बोनस : बोनस कायद्यानुसार देण्याचे ठरले.
नाईट शिफ्ट अलाऊंस : प्रतिनाईट 100 /- रुपये नाईट आलौन्स मान्य करण्यात आले.
रजा : Total 30 Days ( PL - 18 & CL- 12 ) पॉलिसीनुसार देण्यात येईल.
पेड हॉलिडेज : 13 Days वार्षिक पॉलिसीनुसार देण्यात येईल.
ग्रुप लाइफ टर्म इन्शुरन्स : CTC च्या तीन पट पॉलिसीनुसार देण्यात येईल.
मेडिकल इन्शुरन्स : 5 लाख रुपये प्रति वर्ष (पती, पत्नी आणि तीन अपत्य) पॉलिसीनुसार देण्यात येईल.
वार्षिक फॅमिली डे/ पिकनिक डे/ स्पोर्ट्स डे : प्रत्येक वर्षी करण्याचे मान्य करण्यात आले .
कॅन्टीन : एकूण रकमेच्या 80 % कंपनी पेड करणार आणि 20% कामगार पेड करणार असे मान्य करण्यात आले.
ट्रान्सपोर्टेशन : B1 Level कामगारांना ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी पॉलिसीनुसार देण्यात येईल.
फॅक्टरी इन्सेंटिव्ह : कंपनी पॉलिसीनुसार देण्यात येईल.
करारावेळी कंपनी व्यवस्थापन यांच्यावतीने रोहित शर्मा (Plant manager), वीर विक्रम सिंग (HR Head) , प्रमोद ठुबे (HR Manager) तसेच मार्स इंटरनॅशनल इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने कमिटी मेंबर सागर थिटे (अध्यक्ष ), प्रकाश वीर (जनरल सेक्रेटरी), विशाल माने (उपाध्यक्ष), अजय पवार (सह सेक्रेटरी) ,अक्षय वाबळे (खजिनदार) दिपक चव्हाण आणि दिपक जगताप उपस्थित होते.
हा करार यशस्वीररत्या पार पाडण्यासाठी ऑप्शन पॉझिटिव्हचे अरविंद श्रोती यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच श्रमिक एकता महासंघ पुणे यांच्या वतीने सल्लागार मारुती जगदाळे,अध्यक्ष दिलीप पवार, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, रोहित पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.