चाकण : प्लास्टिक ओमनियम चाकण येथील प्लॅस्टिक ओमनियंम एम्प्लॉइज युनियन यांच्या मार्फत आपली सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत मातृभूमीला साजेसे काम करत राजदुर्ग रायगड गडाची श्रमदान करून स्वच्छता दि.८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आली.
या मोहिमे मध्ये जवळपास पन्नास हून अधिक कामगार या स्वच्छता मोहिम मधे सहभागी झाले होते. कामगारांनी अतिशय उत्स्पूर्त पणे प्रतिसाद दिला पुढील काळात प्रत्येक वर्षी किमान एका तरी किल्याला भेट देऊन स्वच्छता मोहीम पुढील काळात राबवणार असल्याचे संघटना पदाधिकऱ्यांनी सांगितले तसेच हि संघटना गेली दहा वर्षापासून अनेक समाज उपयोगी उपक्रम कायम राबवत असते.