दि.23 डिसेंबर 2022 पासून बंद करण्यात आली, परिपत्रक प्रसिद्ध
"नीम (NEEM) " च्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगारांचे चाललेले शोषण व गैरवापर पाहून NEEM योजना रद्द करावी म्हणून "नीम" संबंधी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेल्या होत्या अनेक संघटनांनी या योजनेबाबत तक्रारी केंद्र शासनाकडे मांडल्या होत्या, केंद्र सरकारने दि.23 डिसेंबर 2022 पासून "नीम (NEEM) " योजना बंद करण्यात आली असले बाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
नीम स्कीम बाबतची चुकीच्या पद्धतीने चाललेला गैरवापर, कामगारांचे होत असलेले शोषण व यामुळे आजचे काम करत असलेल्या तरुण पिढी बाबतचे होणारे नुकसान होत होते. "नीम (NEEM) " स्कीम चुकीच्या पद्धतीने राबवली जात असताना त्याचा परिणाम कामगारांच्या रोजगारावर होत देखील होत होता यामुळे कायम कामगारांची संख्या घटत चाललेली आहे व त्यामुळे कंपनीमध्ये गुणवत्ता, शिस्त व कायदेशीर गोष्टींचे पालन न करणे याला आळा बसत आहे. या "नीम (NEEM) " स्कीम मुळे स्टॅंडिंग ऑर्डर,ID ऍक्ट, फॅक्टरी अॅक्ट तसेच इतर कायदे याची पायमल्ली होत होती.
"नीम (NEEM) " स्कीम विरोधात श्रमिक एकता महासंघ आणि सँडविक कामगार संघटना तसेच विविध कामगार संघटना यांच्या वतीने जोरदार विरोध केला होता.