औद्योगिक वसाहतीमधील कंपनीस शॉर्ट सर्किटमुळे आग

नाशिक : सिन्नर येथील मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल साई टेक कंपनीला साधारण मंगळवारी पाच वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    सूत्रांच्या माहितीच्या आधारे असे की साधारण पाच वाजेच्या दरम्यान साई टेक कंपनीत अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने कंपनीत काम करीत असलेल्या सर्वांची एकच धावपळ उडाली. 

    कंपनीत अनेक प्रकारच्या मशिनरी असल्याने तसेच कंपनीत तयार होणारे प्रॉडक्ट असल्याने या आगीत प्रथमता भस्मस्थानी पडले त्यामुळे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. लागलीच सिन्नर नगर परिषदेचे अग्निशामक बंब तसेच माळेगाव औद्योगिक वसाहतीचे अग्निशामक बंब यांना पाचरण करून शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

    यावेळी सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीचे पदाधिकारी तसेच रिंगअर कंपनीचे व्यवस्थापक कामगार यांनी मदत कार्य केले तर साई टेक कंपनीतील कामगार व्यवस्थापक यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत कार्य केले. दीड ते दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीच्या भस्मस्थानी प्राथमिक अंदाजे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.