चाकण : ईएसआयसीची (ESIC) विभागीय शाखा चाकण येथे (दि.13 जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. यामुळे चाकण एमआयडीसी भागातील लाखो कामगार आणि शेकडो कंपन्यांना याचा लाभ होणार आहे असे वृत्त पुणे लाईव्ह वृत्तसंस्थेने दिले आहे.
ईएसआयसीने ऑगस्ट-2016 पासून चाकण क्षेत्रासाठी इएसआयसीची व्याप्ती लागू केली. परंतु आजपर्यंत चाकण येथे शाखा कार्यालय नव्हते. हे कामगार आणि कंपनी प्रतिनिधींना खूप गैरसोयीचे होते. वैद्यकीय हक्क किंवा इतर समस्यांशी संबंधित कोणत्याही कामासाठी त्यांना भोसरी शाखेला भेट द्यावी लागत होती.
त्यामुळे चाकण मधील कामगार संघटना आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने सतत प्रयत्न करून ईएसआयसी कॉर्पोरेशनच्या बिबवेवाडी कार्यालय, दिल्ली, मुंबईचे मुख्य कार्यालय यांच्या कडे पाठपुरावा करून चाकणला इएसआयसी चे कार्यालय मंजूर करून आणले असल्याचे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी सांगितले. या कार्यक्रमास ईएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या ESIC चे कार्यालयाचे उद्घाटन फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री शिवहरी हालन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या समारंभाला ईएसआयसी, दिल्लीचे मुख्य दक्षता अधिकारी श्री मनोज कुमार सिंह, श्री हेमंत पांडे, उप उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. संचालक, ESIC, श्री दिलीप बटवाल सचिव फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज, श्री विनोद जैन खजिनदार फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज, श्री सुशील कुमार आणि राजेश सिंग, Dy Director ESIC, श्री श्रेयश आचार्य, GM, Mahindra, FCI बोर्ड सदस्य आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आजच्या उद्घाटन समारंभात उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री मनोज कुमार सिंह यांनी, दिल्ली येथील संबंधित विभागाशी संपर्क साधून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्याचे आश्वासन दिले, लवकरच या रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले जाईल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल. आणि वैद्यकीय सेवेचा प्रश्न सोडवली जाईल.
या कार्यक्रमात श्री पांडे यांनी उद्योग आणि विमाधारक व्यक्ती (IP) यांना त्यांच्या उत्तम आरोग्य आणि विमा सेवांचे आश्वासन दिले. या समारंभात राजेश कुमार यांनी सर्व मान्यवर, आयपी आणि उद्योग प्रतिनिधींचे स्वागत केले. या कार्यक्रमात श्री सुशील कुमार यांनी आभार मानले.