एनआयपीएम (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट) वतीने शिकाऊ उमेदवारांची नॅट्स व नॅप्स द्वारे नेमणूक करणे या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन

चाकण : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर च्या वतीने २० डिसेंबर २०२२ रोजी चाकण  येथील एआरएआय फोर्जिंग इंडस्ट्रीज व क्वालिटी सर्कल सेंटर भोसरी येथे शिकाऊ उमेदवारांची  नॅट्स (नॅशनल अप्रेन्टिस ट्रेनिंग स्कीम ) व नॅप्स (नॅशनल अप्रेन्टिस प्रमोशन स्कीम)  च्या ऑनलाइन साईटद्वारे नेमणूक करणे या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

    या चर्चासत्रात बोर्ड ऑफ अप्रेन्टिस ट्रेनिंग चे विभागीय उपसंचालक एन एन वडोदे यांनी प्रेसेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना सखोल माहिती दिली ज्यामध्ये या दोन्ही पोर्टलवर उपलब्ध असलेली संबंधित माहिती व ती कशी भरावी, शिकाऊ उमेदवारी नेमणूक कशी करावी व कंपनीच्या वतीने शिकाऊ उमेदवारांना दिले गेलेल्या विद्यावेतनाचा  परतावा मिळवण्याची  उपलब्ध असलेली सोय यासंदर्भात अतिशय सोप्या भाषेत माहिती त्यांनी  समजावून सांगितली. तसेच उपस्थितांच्या शंकाचे निरसनही त्यांनी याप्रसंगी केले. 

    सहाय्यक अप्रेन्टिस सल्लागार बीटीआरआय पिंपरी चिंचवड डी एन गरदाडे व वरिष्ठ अप्रेन्टिस सल्लागार सुनील खुडे यांनीही या चर्चासत्रात मार्गदर्शन केले तसेच बॉश चॅसीस कंपनीचे एचआर वरीष्ठ महाव्यवस्थापक मोहन पाटील यांनी आत्मनिर्भर भारत व स्किल डेव्हलपमेंट या विषयावर सखोल व्याख्यान दिले.

    याप्रसंगी एन एन वडोदे, डी एन गरदाडे, सुनील खुडे, एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरचे चेअरमन नवनाथ सूर्यवंशी इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या चर्चासत्रास  व्हायब्रन्ट एचआर फोरमचे  संथापक  श्री शंकर साळुंके, क्वालिटी सर्कल भोसरी सेंटरचे चंद्रशेखर रुमाले सौ रुमाले , दत्तात्रय नकाते,अतुल घुमटकर, सुनील गोसावी, विजय पाटील, डेक्सटेरीटीचे केतन खिवंसरा व एआरएआय चे अजय रोपलेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

    या चर्चासत्राचा २०० हुन अधिक एच आर क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनआयपीएम पीसीसी चे संथापक , माजी अध्यक्ष व मार्गदर्शक अमोल कागवाडे, एनआयपीएम  पीसीसी कमिटीचे उपाध्यक्ष सतीश पवार, अतिरिक्त सेक्रेटरी चेतन मुसळे, खजिनदार प्रदीप मानेकर ,सदस्य रमेश बागल, राहुल निंबाळकर व मधुकर सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिवाईन एचआर फोरमच्या संस्थापिका प्रीती साखरे यांनी केले.