झामील स्टील बिल्डींग इंडिया (Zamil Steel Buildings India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव MIDC येथील झामील स्टील बिल्डींग इंडिया (Zamil Steel Buildings India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि झामिल स्टील बिल्डींग इंडिया कामगार संघटना यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ठ्ये पुढीलप्रमाणे : 

करार कालावधी : कराराचा कालावधी चार वर्ष असेल (1मार्च 2022 ते 28 फेब्रुवारी 2026)

एकूण पगार वाढ  :अप्रत्यक्ष रु.21000/- तसेच प्रत्यक्ष रु.19700/- रू एवढा झाला आहे.
प्रथम वर्ष : रु.4200/-
दुसरे वर्ष : रु.5100/-
तिसरे वर्ष : रु.5200/-
चौथे वर्ष  : रु.5200/- 

फरक रक्कम : दि.1 मार्च 2022 पासून ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत रुपये 27650/- एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.

दिवाळी बोनस : बोनस ऍक्ट प्रमाणे 8.33% मिळेल,तसेच एक्स ग्रेशिया वरती दरवर्षी बोलणी होतील.
(सन 2021 ते 2022 या कालावधीतील बोनस 8.33 आणि एक्स ग्रेशिया सहा हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे)

मेडिक्लेम पॉलीसी : रु.2,50,000/- ते रु.3,00,000/-

जीपीए : आपल्या सीटीसी(CTC) पॅकेजच्या सहापट राहील

जीटीएलआय : एलआयसी कंपनीचा वीस लाख (20,00,000) रुपये राहील
(मागील सर्व चालू सुविधा यापुढे अशाच चालू राहतील.)

   करार संपन्न होताना विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची उत्पादकतेमध्ये तसेच उत्पादनामध्ये वाढ करण्यात आली नाही व कुठल्याही प्रकारचा इन्सेंटिव लावला नाही.

   करार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोरजी ढोकले, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे उपाध्यक्ष राजूआण्णा दरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

    करारावेळी व्यवस्थापनाच्या वतीने प्लॅन्ट हेड डायरेक्टर ऑपरेशन संजीवजी दत्ता, सीनियर प्रॉडक्शन मॅनेजर प्रफुल्ल वनारे, मॅनेंजर एचआर आयआर एडमिन हेड राहुल भागवत आणि कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रमोद गवारी, उपाध्यक्ष गणपत म्हस्के, उपाध्यक्ष संपत मलगुंडे, ज.सेक्रेटरी कैलास शेलार, खजिनदार बळीराम पाटील, सदस्य दादाभाई महाले, मंगेश बढे, विजय आबुज, सुशील गायकवाड यांनी काम पाहिले.

विविध कामगार विषयक पुस्तक मिळवण्यासाठी क्लिक करा.