पुणे : कामगार कल्याण मंडळ पुणे विभाग- पुणे गटाच्या वतीने गटस्तरीय खुली महिला एकांकिका नाट्य स्पर्धा दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पुणे विभागाचे प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या.
यावेळी एकूण ८ संघानी सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका, जेष्ठ नाट्य दिग्दर्शिका विनीता पिंपळखरे तर प्रमुख पाहुणे शितल सुलाखे हुंदायी सर्व्हिस स्टेशनच्या एच आर हेड तसेच कामगार भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वाघ हे होते तर परिक्षक म्हणून प्रभाकर पवार, श्रीमती अनुराधा कुलकर्णी, श्रीमती संध्या कुलकर्णी यांनी काम पाहिले.
विनिता मॅडम यांनी महिलांनी नवीन सामाजिक विषयांचे सादरीकरण केले समाजातील पिढीत कर्तृत्व, नेतृत्व सिध्द करणारे विषयांवर सादरीकरण व्हावे जेणे करुन महिलांचे सक्षमीकरण होणार होईल असे सांगितले.
या स्पर्धेत एकूण ८ संघानी सहभाग नोंदविला या मध्ये "प्रथम क्रमांक" -- कामगार कल्याण केंद्र सणसवाडी एकांकिका "अंत आरंभ" ने पटकवला. "द्वितीय क्रमांक" - कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर एकांकिका -- "नेकी" तर "तृतीय क्रमांक" - कामगार कल्याण केंद्र हडपसर एकांकिका -- "किटी पार्टी" ने पटकावला.
तर उत्कृष्ट अभिनय प्रथम क्रमांक आरती गोगटे, द्वितीय क्रमांक - सरभी कुलकर्णी, तर तृतीय क्रमांक - भारती साठे यांनी मिळवला.
तसेच दिग्दर्शनाचे पुरस्कार प्रथम क्रमांक - वैभव नवसकर नाटक - अंत आरंभ, द्वितीय क्रमांक - सुनिल कुलकर्णी नाटक - नेकी, तर तृतीय क्रमांक - सिमा पोंक्षे नाटक - किटी पार्टी यावेळी संजय सुर्वे यांनी सुत्रसंचालन केले प्रदिप बोरसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालक सुनिल बोरावडे, अविनाश राऊत, अरुण वाडकर तसेच श्रीमती शुभांगी नावडीकर, श्रीमती प्रतिभा येरम, नरके व आढारी यांचे सहकार्य लाभले. सर्व स्पर्धा सुदर्शन हॉल, शनिवार पेठ, पुणे येथे पार पडल्या.
