पुणे : हडपसर येथील क्लीन एनर्जी सिस्टिम (Clean Energy Systems) कंपनी व्यवस्थापन आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांच्यामध्ये शांततामय,उत्साही आणि आनंदी वातावरणात गुरुवार दि. 20 ऑक्टोबर 2022 रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला. यावेळी कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले उपस्थित होते.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :-
कराराचा कालावधी : तीन वर्षे (सन 2022 ते 2025)
एकुण पगारवाढ : रु.13,500/ - ही पगारवाढ पहिल्या वर्षापासून तिसर्या वर्षी पर्यत एकसारखी असेल.
बोनस : पहिल्या वर्षा पासून तिसऱ्या वर्षी पर्यंत 20 % देण्यात येईल.
सानुग्रह अनुदान : रु.9,500/ - प्रती वर्षी.
कॉन्ट्रॅक्ट मधील 5 नविन कामगार सुध्दा परमनंन्ट करण्यात आले.
करार यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने मॅनेजर आर.एस.महाजन तसेच कामगार संघटनेच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले,युनिट अध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष बजरंग भगत, सचिव संभाजी साळे, सदस्य दिनेश रोकडे यांनी काम पाहिले.
