कामगारांवरील अन्याय खपवून घेणार नाही त्यांना न्याय मिळवून द्यावा

देहूरोड : मावळामधील लार्सन अँण्ड टुब्रो डिफेन्स कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय केला जात आहे. मात्र, शिवसेना हा न्याय खपवून घेणार नाही. या कामगारांना न्याय मिळून देणारच. शिवसेना या कामगारांच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे. येणाऱ्या काळात स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्या पद्धतीने पुढील लढा लढतील, त्यात शिवसैनिक मोठ्या ताकतीने त्यांच्यासोबत असतील तसेच सर्व राजकीय पक्षांनी, विविध संघटनांनी एकत्र येऊन या कामगारांच्या लढ्यात सहभागी होऊन न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन युवा सेना जिल्हाअधिकारी अनिकेत घुले यांनी केले असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.

    तळेगाव दाभाडे जवळील लार्सन अँण्ड टुब्रो डिफेन्स कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांच्या बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात स्थानिक भुमिपुत्र कामगारांनी पुण्यातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका शिवसेनेचे शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, मदन शेडगे, संजय भोईर, अशोक निकम, अक्षय येळवंडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते. कामगार प्रतिनिधी महेंद्र शिंदे, संदीप गायकवाड, देवा शिरसट, एकनाथ बिनवडे, विजय कदम, अक्षय घुले, आदी पदाधिकारी व कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

-रस्त्यावर उतरायाला भाग पाडू नका

    मावळच्या शेतकऱ्यांनी नाममात्र दरात कंपन्यांना जमिनी दिल्या. मात्र, या कंपन्या स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करीत आहेत. बारा तास नोकरी करून अतिशय कमी वेतन दिले जाते. काही कंपन्या ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याच्या शासनाच्या धोरणाला हरताळ फासत आहेत. लार्सन अँड टुब्रो कंपनी व्यवस्थापनाने राजकारण करून भूमिपुत्र कामगारांच्या परराज्यात बदल्या केल्या आहेत. या बदल्या तात्काळ रद्द करून कामगारांवरील अन्याय थांबवावा; अन्यथा रस्त्यावर उरातून तीव्र आंदोलन चछेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख भारत ठाकर यांनी दिला.