नाशिक : थिसनकृप रोथे एर्डे इंडिया प्रा. लि. (Thyssenkrupp Rothe Erde India Pvt Ltd) ( डिवीजन क्रँकशाफ्ट) कंपनी व्यवस्थापन आणि सी आय टी यू कामगार संघटना नाशिक (CITU) यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल कराड, जिल्हा उपाध्यक्ष कॉ देविदास आढोळे, सरचिटणीस कॉ सीताराम ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
पहिले वर्ष - ३५%
दुसरे वर्ष - २०%
तिसरे वर्ष - २२.५%
चौथे वर्ष - २२.५%
ग्रुप a) रू.१६४७०/-
ग्रुप b) रू.१५४७०/-
ग्रुप c) रू.१७४७०/-
फरक : प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १२ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.
मेडिक्लेम पॉलीसी : रुपये २,००,०००/- संपूर्ण खर्च कंपनी करणार, व जादाची १०,००,०००/- रुपयांची बफर पॉलीसी, या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, मुले यांचा समावेश करण्यात आला आहे.
मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व तेवढीच रक्कम कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : वार्षिक उत्पन्नाच्या तीन पट रुपये रक्कम कंपनीकडून देण्यात येईल.
ग्रुप टर्म इन्शुरन्स : महिन्याच्या उत्पन्नाच्या ३६ पट कुठल्याही प्रकारे मृत्यू झाल्यास देण्यात येईल.
A) PL - २०, B) SL - १३, C) CL - १२, D) PH - ०९
दिवाळी बोनस : कायदेशीर बोनसच्या व्यतिरिक्त अधिकचा बेसिक + डीए + व्हीडीए च्या १२% रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, व भेट वस्तू देण्यात येईल.
फॅमिली डे तीन वर्षातून एकदा.
गणेशोत्सव प्रतीवर्षी कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या कॉन्ट्रीब्युशनने साजरा होईल.
सलग १० वर्षे नोकरी झाल्यास रु. १५,०००/- रोख रक्कम.
अत्यावश्यक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास रुपये ३०,०००/- (तीस हजार) रुपये देण्याचे मान्य केले.
आर्थिदृष्ट्या पाठिंबा म्हणून : रुपये १,००,०००/- (एक लाख रू.) घर घेणे, शिक्षण, पालक आजारी असल्यास.
जादा कामाचा मोबदला : साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामावर आल्यास महिन्याच्या पगाराच्या दोन पट पगार व एक सुट्टी देण्याचे मान्य
a) कँटीन सुविधा मागील प्रमाणे
b) बस सुविधा मागील प्रमाणे ठेवण्यात आली आहे.
a) उच्च प्रतीचे टी शर्ट १, b) पॅन्ट - २, शर्ट -२, c) शूज - एक जोड
करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे ओनिडे चिमेलो (सी.ई.ओ.), योगेश बोरसे (डायरेक्टर), सचिन थोरात (फायनान्स हेड), सुशील हिरे (एच आर मॅनेजर) आणि संघटनेच्या वतीने प्रमुख कॉ. डॉ. डी.एल.कराड (संघटनेचे अध्यक्ष), कॉ. देविदास आढोळे (जिल्हा उपाध्यक्ष), कॉ.सीताराम ठोंबरे (जिल्हा सरचिटणीस) लोकल कमिटी मेंबर - कॉ.सागर मुसळे, कॉ.महेश बकरे, कॉ.महेंद्र पगारे, कॉ.प्रसाद पाटील, कॉ.हेमेंत दुसाने यांनी सह्या केल्या.
यावेळी संघटनेच्या वतीने प्रमुख अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.

