पुणे : कोरेगाव भिमा ,पुणे येथील सेको टूल्स इंडिया प्रा.लि.(Seco Tools India Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि राष्ट्रवादीे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांच्या मध्ये माथाडी कामगारांचा वेतनवाढ करार करण्यात आला.
करार कालावधी व वेतनवाढ : करारानुसार कंपनीत काम करणारे माथाडी कामगारांना तीन वर्षा करीता (दि.१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४) दरमहा रूपये ३८,७५०/- लेव्हीसह वेतन मिळणार आहे. तसेच फरक रक्कम मिळणार आहे.
विमा : रु.२ लाख मेडिक्लेम पॉलिसी, रु.१० लाख अपघात विमा
इतर सुविधा : यामध्ये कॅन्टीन सुविधा, पगारी सुट्ट्या, वार्षिक स्नेहसंमेलन, व इतर सेवासुविधा देण्यात आल्या.
या कराराप्रसंगी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर एच.आर.श्रीमती सुपर्णा रे, जनरल मॅनेजर ऑपरेशन सपोर्ट अॅण्ड परचेस शिवाजी कोल्हे, डेप्यूटी जनरल मॅनेजर आय.आर. & अॅडमीन श्रीमती प्रतिक्षा भोसले यांनी व संघटनेचे वतीने राष्ट्रवादीे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन संघटनेचे अध्यक्ष तेजस दादा शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ आप्पा शिंदे, प्रदेश जनरल सेक्रेटरी विठ्ठलराव गोळे, संयुक्त सरचिटणीस जयदीप बडदे, सचिव रामेश्र्वर निकम, टोळी मुकादम अशोक माने, सुदर्शन शिंदे यांनी करारावर सह्या केल्या. तसेच सदरील करारास पुणे माथाडी बोर्डाचे अध्यक्ष व सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, बोर्डाचे सचिव व सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत चोभे बोर्डाचे इन्स्पेक्टर पंकज बादल यांनी कायदेशीर मान्यता देऊन करारावर सह्या केल्या.