सणसवाडी, शिरूर : येथील ऑर्लिकाँन फ्रिक्शन सिस्टिम्स इंडिया प्रा. लि. (Oerlikon Friction Systems India Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि ऑर्लिकाँन फ्रिक्शन सिस्टिम्स ऍम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी पहिला वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
कराराचा कालावधी : सदर वेतनवाढ करार तीन वर्षाकरिता आहे. (दि.०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२५)
दि.१ एप्रिल २०२२ पासूनची फरकाची रक्कम कामगारांना अदा करण्यात येणार आहे.
बोनस : २०% देण्यात येणार
बस सेवा व कॅन्टीन सेवा मोफत
रजा : वर्षात एकूण ३० रजेची सोय केली आहे तसेच वर्षाला एकूण १२ पगारी सुट्यांची तरतूद केली आहे.
गिफ्ट कार्ड : प्रत्येक वर्षाकरिता गिफ्ट कार्ड यामध्ये पहिल्या वर्षाकरिता - रुपये १०,०००/-, दुसऱ्या वर्षाकरिता - रुपये ११,०००/-, तिसऱ्या वर्षाकरिता - रुपये १२,०००/- देण्याची तरतूद आहे.
मेडिक्लेम पॉलिसी : रुपये 3 लाखपर्यंत मेडिक्लेम पॉलीसी त्यामध्ये आई वडील यांचा पण समावेश आहे.
मिठाई : दसऱ्याला 1kg सुकामेवा तर दिवाळीला 1kg मिठाई वाटप होणार आहे.
वार्षिक सहल : वर्षातून एकदा कामगारांकरिता सहल आयोजित केली जाणार आहे.
मरणोत्तर साहाय्य निधीची तरतूद आहे, वर्षातून एकदा खेळाचे आयोजन करण्याची तरतूद आहे, प्रत्येक वर्षी कुटुंबियांसाठी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जाणार आहे, शॉर्ट लिव्हची तरतूद आहे, इत्यादी सुविधांची तरतूद करारामध्ये केला आहे.
सदर करारा वरती कंपनीच्या वतीने भास्कर रमण (प्रेसिडेंट), नचिकेत कणसे (HR एशिया हेड), संतोष पालवे (DGM), कांगयान (HR DGM), परशुराम गावडे (HR), विजय जिभकाटे (प्रोडक्शन मॅनेजर), गौरव जोशी (क्वालिटी मॅनेजर) युनियनच्या वतीने अध्यक्ष गौतम ढेरंगे, ज.सेक्रेटरी गणेश शितोळे, खजिनदार संकेत दळवी, उपअध्यक्ष सागर शिवले, सहसेक्रेटरी अमोल गवारी, सदस्य प्रतीक आढाव, कुलदिल पाटील यांनी स्वाक्षरी केली. यावेळी कामगारांनी पेढे वाटून कराराचा आनंद साजरा केला.
करार यशस्वी होण्याकरिता श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, रोहित पवार, संतोष भुजबळ, काळूराम इंगळे, अरुण घुले मार्गदर्शक अरविंद श्रोती, सल्लागार मारुतीराव जगदाळे यांनी काम पाहिले.

