कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड येथे भारतीय कामगार सेना नवनिर्वाचित प्रतिनिधी यांची निवड

पुणे : मरकळ ता.खेड येथील कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड  उद्योगामधील कामगार यांनी भारतीय कामगार सेना शिवसेना ह्या संघटनेचे अधिकृत सभासदत्व स्विकारले आहे.

        डॉ.रघुनाथ कुचिक शिवसेना उपनेते, प्रदेश सरचिटणीस भारतीय कामगार सेना यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट अध्यक्ष हनुमान लोखंडे, उपाध्यक्ष महेंद्र गोसावी, जनरल सेक्रेटरी प्रशांत कळेकर, खजिनदार मेघश्याम वैद्य, युनिट मेम्बर भानुदास चव्हाण, संदीप लोखंडे, दत्तात्रय पाटील यांची निवड करण्यात आली अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.