सणसवाडी ता. शिरूर : येथे आज शनिवार दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय, एल. एन. टी. फाटा, सणसवाडी येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या तसेच व्यापारी, दुकानदार व श्रमिक यांच्या विविध प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी कामगार संवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष रेवननाथ गायकवाड यांनी दिली.
नवीन येऊ घातलेले कामगार कायदे व त्यामधील तरतुदी यामुळे कामगार जगतावर होणारे परिणाम तसेच व्यापारी, दुकानदार व श्रमिक यांच्यावरती होणारे परिणाम याबाबत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शरद पाबळे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पत्रकार शेरखान शेख, कामगार नामा मुख्य समनव्यक भूषण कडेकर यांचा सत्कार तसेच विविध पत्रकार यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे देण्यात आली.
सणसवाडी येथील कृष्ण लीला गार्डन मंगल कार्यालय येथे कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी तसेच व्यापारी, दुकानदार व श्रमिक कामगारांचे प्रश्न समजून घेत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त कामगार वर्ग, कामगार प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
