नील मेटल प्राँडक्टस लि. व कामगार कल्याण केंद्र चाकण यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

चाकण : जे. बी. एम. ग्रुप मधील नील मेटल प्राँडक्टस लि.चाकण या आस्थापने मध्ये नील फाऊंडेशन व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. 

    कार्यक्रमाचे उदघाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे निरीक्षक इरफान खान, महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, वाहतुक निरीक्षक सुनिल चौरे व केंद्र संचालक अविनाश राऊत यांनी दिप प्रज्वलन करुन रक्तदान कार्यक्रमास सुरवात केली.

यासाठी केंद्र संचालक अविनाश राऊत, युनिट हेड मिलिंद जठार, एच आर हेड संजय भसे, ऑपरेशन हेड सच्चानंद ढकनेजा, एच आर विभाग काळुराम रेटवडे युनियन प्रतिनीधी संतोष पवार तसेच कंपनी हिंद कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.यावेळी एकूण 271 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची रूपरेषा व सूत्र संचालन एच आर हेड संजय भसे यांनी केले व आभार प्रदर्शन युनिट हेड मिलिंद जठार यांनी केले.