शिकाऊ कामगार हे कंपनीचे कायम कामगार - औद्योगिक न्यायालय

कामगारा ला भारतीय औद्योगिक अर्थव्यवस्थेचा कणा मानलं जात कारण तो स्वतः श्रम करून औद्योगिक क्षेत्र भरभराटीस आणण्याचं काम करत असतो. कामगार ला कायद्यानं एक दुर्बल घटक म्हणूंन संबोधित करून त्याला कायद्याचे संरक्षण मिळावे या उद्धेश्याने  वेगवेगळे कायदे करून त्याला व त्याच्या परिवारास विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे हाच त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. 

     हा उद्देश नजरे समोर ठेऊन 'कामगार नामा' मध्ये या पुढे आपण कामगार बंधू, भगिनींच्या मागणी नुसार "कामगार  न्याय जगत" हे नवे सदर सुरु केले आहे. या माध्यमातून कामगार बंधू-भगिनींना न्यायालयाने दिलेले न्यायनिर्णय सोप्या स्वरूपात माहिती करून देत आहोत व त्याच बरोबर न्यायालय निकाल PDF उपलब्ध करुन दिली जात आहे.

शिकाऊ कामगार हे कंपनीचे कायम कामगार - औद्योगिक न्यायालय

शिकाऊ कामगार हे कंपनीचे कायम कामगार असा महत्त्वपूर्ण निकाल औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. 

याबाबत माहिती अशी : हजेरीपटावर कायम कामगार 10 टक्के ठेवणे व 90 टक्के कामगार शिकाऊ अथवा कंत्राटी पद्धतीने ठेवून त्यांना सेवाशर्तीपासून वंचित ठेवण्याच्या अवलंब बहुसंख्या औद्योगिक कंपन्या करीत आहे, या कामगारांना एक ते दोन वर्षानंतर कामावरून काढले काढून टाकले जाते व त्यांच्या जागेवर नवीन कामगार भरती होतात, अशी अन्यायकारक प्रथा अनेक कारखान्यांमध्ये वर्षानुवर्ष चालू आहे. 

    रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने शिकाऊ कामगार म्हणून घेऊन त्यापैकी अनेकांना अडीच वर्षाच्या नोकरीनंतर 2010 च्या अखेरीस कामावरून काढून टाकले होते. त्यापैकी 31 कामगारांच्या वतीने लोककल्याण मजदूर युनियनचे अध्यक्ष ॲड.आर. बी शरमाळे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता.

न्यायालय आदेश :

     या शिकाऊ आणि नोकरीतून कमी केलेल्या कामगारांना नोकरीच्या सलगतेसह कायम कामगार म्हणून कामावर घ्यावे आणि घरी बसविलेल्या मधील काळाचे 50 टक्के वेतन फायदे द्यावेत, असा महत्त्वपूर्ण निकाल औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. कुंभार यांनी दिला. 

     औद्योगिक न्यायालयाच्या प्रदीर्घकाळ झालेल्या सुनावणीनंतर हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. 

(संदर्भ - Ref.(IT) No.10/2012  CNR. No. MHIC12­000112­2012) - निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.