पुणे : जिल्ह्यात मंडळातील नोंदीत आणि ठेकेदाराकडील अनोंदित किमान एक लाखापेक्षा अधिक सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुण्यामध्ये कामासाठी अनेक कामगार सुरक्षा रक्षकाचे काम करीत आहेत.
राज्य शासनाने शासन निर्णय आणि राजपत्रित अधिसूचनाद्वारे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, कारखाने, आस्थापना येथील सर्व कामगार अधिकारी यांना पगारी सुट्टी दिली असून पण सुरक्षा रक्षकांना या शासन निर्णय किंवा अधिसूचनाचा काहीच फायदा होत नाही किंवा होणार नाही. सुरक्षा रक्षक मंडळ किंवा आस्थापना मतदान करण्यासाठी कुठलीच उपाय योजना करत नाही किंवा केलेल्या नाहीत.
सुरक्षा रक्षकांने मतदान करण्यासाठी सुट्टी घेतली तर गैर हजेरी लागते.सुट्टीचा पगार मिळत नाही.तर मग मतदान करायचे तर कसे ? याविषयी सुरक्षा रक्षक मंडळ आणि जिल्हाधिकारी पुणे यांना महासंघाने निवेदनाद्वारे कळविले असुन अद्याप याविषयी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर मग १०० टक्के मतदान होणार तर कसे होणार ? का ? मग लोकशाही हा शब्द कागदावरच राहणार आहे ? ही बाब गंभीरतेने घेण्याची गरज आहे. सुरक्षा रक्षकांनी सुध्दा मतदान करावे यासाठी उपाय योजना करण्याची तत्काळ गरज आहे.
अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदुर संघ पुणे अध्यक्ष युवराज,राजकुमार काळे,सचिव तुकाराम कुंभार यांनी दिली.
