पुणे : रांजणगाव MIDC येथील एलरिंग क्लिंगर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लिमी. (ElringKlinger Automotive Components (India) Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि एलरिंग क्लिंगर इंडिया कामगार संघटना यांच्यामध्ये चौथा वेतन वाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक १७ जून २०२२ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :
करार कालावधी : तीन वर्ष असेल (१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४)
ग्रॉस मध्ये
प्रथम वर्ष : रु.७,९४८/-
दुसरे वर्ष : रु.३,६१२/-
तिसरे वर्ष : रु.२,८९०/-
फरक रक्कम : दि. १ जानेवारी २०२२ पासून ते ३० जून २०२२ पर्यंत रुपये रु.४५,३९६/- एक रकमी रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले.
शांततेत करार संपन्न झाला म्हणून व्यवस्थापनाकडून ५,००० रुपये प्रति कामगारांला पैशांच्या स्वरूपात देण्यात आले व असेच कंपनी शांततेचे व खेळेमेळीचे वातावरण कामगारांनी ठेवले तर पुढील वर्षी पण ५,००० रुपये प्रति देण्यात येईल.
दिवाळी बोनस : १०% प्रमाणे मिळेल.
मेडिक्लेम पॉलीसी : रु.२,५०,०००/- + बफर - रु.२,५०,०००/-
जीपीए : रु.२३,७१,४०४/- वरून रु.३०,४३,४८८/- करण्यात आला. (रु.६,७२,०००/- वाढ)
जीटीए : रु.२७,१०,०००/- वरून रु.४३,४७,८४०/- करण्यात आला. (रु.१६,३८,०००/- वाढ)
१५ वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना - ७,५०० रुपये
१० वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना - ५,००० रुपये
फॅमिली डे : वार्षिक फॅमिली डे जर काही कारणास्तव झाला नाही तर गिफ्ट व्हॉउचर म्हणून देण्यात येईल
अॅडव्हान्स : वार्षिक अॅडव्हान्स रु.१,००,०००/- व फक्त आपत्कालीन रु.१,००,०००/- बिनव्याजी देण्याचे व्यवस्थापनांने मान्य केले.
(मागील सर्व चालू सुविधा यापुढे अशांच चालू राहतील.)
करार संपन्न होताना विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची उत्पादनामध्ये वाढ करण्यात आली नाही व कुठल्याही प्रकारचा इन्सेंटिव लावला नाही.
करार करताना व्यवस्थापनाच्या वतीने प्लॅन्ट मॅनेजर अरुण मिश्रा, सिनियर मॅनेंजर एच आर हेड ज्ञानेश्वर डाळींबकर, फायनान्स मॅनेजर चिन्मय शाहू, प्रॉडक्शन मॅनेजर अकिंत थाप्पा, एच आर नंदू आहेर, सेल्स मॅनेजर सुनील पडवळ तसेच संतोष चिखले, सुशील सुर्वे, सुरेश वाळके यांनी तर कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष विलास राहणे, उपाध्यक्ष रवि ठाकरे, ज.सेक्रेटरी प्रेमराज महाले, सेक्रेटरी जयदिप सातपुते, खजिनदार राहूल पाटील, सदस्य बापु सानप, सायलू उप्पलवार यांनी काम पाहिले.
करार यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोरजी ढोकले, राष्ट्रीय एकता महासंघाचे उपाध्यक्ष राजूआण्णा दरेकर यांचे सहकार्य लाभले मिळाले असे कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.