पिंपरी चिंचवड : फोसिको इंडिया लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापनाने युनियनचे जनरल सेक्रेटरी काळूराम इंगळे यांच्याविरुद्ध खोटेनाटे आरोप लावून त्यांना चौकशीच्या नावाखाली निलंबित केले असून या कामगार प्रतिनिधी व कामगार यांच्यामागे श्रमिक एकता महासंघ खंबीरपणे उभी असून त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल अशी माहिती श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी दिली.
पुढे पवार म्हणाले की, व्यवस्थापनाची अन्यायकारक उत्पादन वाढीची मागणी युनियन मान्य करीत नसल्याच्या रागापोटी काळूराम इंगळे यांचे विरुद्ध खोटे आरोप लावून युनियन वर दबाव टाकण्याच्याई वाईट हेतूने कारवाई केली असल्याची जाणीव सभासदांना असल्याने सभासद कामगारांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा करून आपल्या जनरल सेक्रेटरी यांना रुपये ३० (तीस हजार ) आर्थिक सहाय्य करून आम्ही आमच्या नेत्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची जाणीव व्यवस्थापनास करून दिली आहे.
काळूराम इंगळे यांच्याविरुद्ध केलेली कारवाई रद्द करण्याच्या मागणी करिता फोसिको इंडिया एम्पलॉइज युनियने सर्व सभासद कामगारांच्या संमतीने १८ जून २०२२ रोजी पासून संप पुकारला आहे. त्यास श्रमिक एकता महासंघ व सर्व संलग्नसं घटनांचा सक्रिय पाठिंबा आहे. अशी माहिती श्रमिक एकता महासंघ यांच्याद्वारे देण्यात आली.