कंपनीच्या नावाने बनावट सही शिक्के वापरुन बनवले बोगस जॉइनिंग ऑफर लेटर ८० कामगारांची  फसवणुक

रांजणगाव : बोगस प्लेसमेंट च्या माध्यमातून रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची होत असलेली लूट  न थांबता सुरुच आहे. त्यातच आता थेट कंपन्यांच्या नावाने बोगस  नियुक्ती पञ देऊन फसवणूक करण्यात आली असून याबाबत ama9 news या वृत्तसंस्थेने दिले आहे.

    येथील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील  "हायर अपलायंनसेंस (इंडिया) प्रा. लि. या कंपनीत कामाला लावण्याच्या नावाखाली बिहार येथील भागलपुर या ठिकाणी आय टी आय मध्ये शिक्षण घेत असलेल्या ८० विद्यार्थ्यांना कंपनीच्या नावाने बनावट सही शिक्का वापरुन नोकरीचे बनावट जॉइनिंग ऑफर लेटर देऊन त्यांच्याकडुन पैसे घेऊन आर्थिक फसवणुक करत गंडविणाऱ्या दोन भामट्यांच्या रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी प्रणय सुर्यकांत धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

    रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि १५) रोजी सकाळी ११ च्या सुमारास तीन युवक हायर अपलायंनसेंस (इंडिया) प्रा. लि. या कंपनीच्या गेटवर आले. त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे असलेले जॉइनिंग ऑफर लेटर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला दाखवले. परंतु त्याला त्या जॉयनिंग लेटरबाबत शंका आल्याने त्याने ते लेटर कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी अंकलेश महाले आणि  प्रणय धुमाळ यांना दाखवले. सदरच्या "ऑफर लेटरवरती" हायर कंपनीचे नाव व शिक्का वापरुन बनावट "नियुक्ती पञ  " कोणीतरी तयार करुन मुलांना दिले असून त्यांची फसवणुक केली  असल्याचे या दोघांच्या निदर्शनास आले. 

    त्यानंतर त्यांनी त्या तीन युवकांकडे अधिक चौकशी केली असता. त्यांनी सांगितले की, आमच्या बिहार येथील भागलपुर येथील आय टी आय कॉलेजमध्ये (दि ५) जुन रोजी राहुल गौतम गरामी आणि  सुमन तितास मंडल हे दोघे (रा. जमालपुर, पश्चिम बंगाल) हे आले होते. त्यांनी आमच्या कॉलेजमधील शिक्षकांना हायर कंपनी  पुणे येथुन आलो असल्याचे सांगुन आमच्या आय टी आय मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवुन त्यापैकी ८० विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना हायर कंपणीचे (दि.१६) रोजी जॉईनिंगचे ऑफर लेटर दिले असुन प्रत्येक विद्यार्थाकडुन ५ हजार प्रमाणे एकुण ४ लाख रुपये विद्यार्थ्यांना हायर कंपनीच्या नावाने बनावट सही शिक्के वापरुन "नियुक्ती पञ" दिल्याचे सांगितले.

    त्यानंतर हायर अपलायंनसेंस (इंडिया) प्रा लि चे एच. आर. एडमिन मॅनेजर प्रणय सुर्यकांत धुमाळ यांनी तात्काळ रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात धाव घेत सदर प्रकार पोलिसांच्या लक्षात आणुन देत फिर्याद दाखल केली. त्यामुळे पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, रघुनाथ हळनोर यांनी तात्काळ कारवाई करत या दोन भामट्यांना अटक करुन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असुन रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे पुढील तपास करत आहेत.