राठी ट्रान्सपॉवर प्रा.लिमीटेड (Rathi Transpower Private Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : मरकळ रोड येथील राठी ट्रान्सपॉवर प्रा.लिमीटेड (Rathi Transpower Private Ltd) कंपनी व्यवस्थापन व पुणे मजूर संघटना यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढील प्रमाणे : 

  • करार कालावधी : मार्च 2022 पुढे तीन वर्ष राहील 

  • पगारवाढ : रुपये 13,500/- करण्यात आली. सदर पगारवाढीची पन्नास टक्के रक्कम मूळ पगारामध्ये समाविष्ट करण्याचे मान्य झाले

  • हक्काची रजा 30 दिवस भर पगारी मिळतील 

  • घरबांधणीसाठी रुपये 1,50,000/- बिनव्याजी कर्ज

  • लग्नकार्यासाठी रुपये 1,50,000/- बिनव्याजी कर्ज

  • दवाखाना उपचारासाठी रु.1,00,000/-

  • कामगारांच्या  मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी एक लाख रुपये.

  • दरवर्षी ठेकेदाराकडील पाच कामगारांना कायम करण्यात येईल

  • वार्षिक सहल आयोजित केली जाणार

   करारावर व्यवस्थापनाच्या वतीने आदितभाऊ राठी (व्यवस्थापकीय संचालक), कुमार दंडपाणी (व्हाईस प्रेसिडेंट पर्सनल), महेंद्र फणसे (डेप्युटी जनरल मॅनेजर आय आर) आणि मयुरेश कुलकर्णी (व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन) तसेच संघटनेच्या वतीने रामचंद्र शरमाळे (जनरल सेक्रेटरी), विवेक कांबळे तसेच युनिट प्रतिनिधी माणिक पडवळ, संजय थोरवे, राजेंद्र बुर्डे, सोमनाथ कदम, अनिल राटोळे, संदीप  अटाळकर यांनी सह्या केल्या या करारामुळे कामगारांमध्ये अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.