चाकण : भांबोली (चाकण), पुणे येथील दाणा इंडिया प्रा.लिमीटेड (Dana India Pvt Ltd.) कंपनी व्यवस्थापन व शिवगर्जना कामगार संघटना ,पुणे यांच्यामध्ये तिसरा वेतन वाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दि. 30 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाला. औद्योगिक क्षेत्रातील सर्वांत मोठा करार म्हणून हा करार ओळखला जाईल.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
- करार कालावधी : सदर करार चार वर्षासाठी लागू असेल (दि. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2025)
- पगारवाढ : चार वर्षासाठी 27100 /- रुपये
1) प्रथम वर्षासाठी रक्कम - रु. 13550/-
2) द्वितीय वर्षासाठी रक्कम - रु. 5420/-
3) तृतीय वर्षासाठी रक्कम- रु. 4065/-
4) चतुर्थ वर्षासाठी रक्कम- रु. 4065/-
- फरक : (एरियस्) साधारणतः रु.2,00,000/- देण्याचे मान्य केले
- शिफ्ट अलाउन्स : प्रत्येक दिवसाला रु.24/- प्रमाणे देण्याचे मान्य केले ( CTC व्यतिरिक्त )
- अटेंडन्स अलाउन्स : (CTC व्यतिरिक्त)
2) 1 दिवस गैरहजर - रु.500/- प्रमाणे देण्याचे मान्य केले.
- फॅमिली डे : प्रत्येक वर्षातून एकदा करण्याचे मान्य केले .
- कॅन्टीन : चालु असलेल्या सुविधा व्यतिरिक्त कुटलेही जादा शुल्क न आकारता 1st आणि 2nd शिफ्ट ला केळी आणि नाईट शिफ्ट दूध देण्याचे मान्य केले .
- गणवेश : प्रत्येक वर्षी 2 जोडी ड्रेस, प्रत्येक वर्षी 1 टी शर्ट आणि सेफ्टी वीक मध्ये 1 टी शर्ट तसेच 4 वर्षातून 2 वेळा जर्किन देण्याचे मान्य केले .
- टर्म लोन : १ लाख रुपये देण्याचे मान्य केले (बिगर व्याजी)
- मेडिक्लेम पॉलिसी : रु.4 लाख तसेच आई वडिलांची 2 लाख रुपयेची पॉलिसी, तसेच 4 लाख बफर प्रत्येक कामगार व त्याचा परिवार तसेच आई-वडील यांच्यासाठी 2 लाख बफर देण्यात आला आहे.
- ग्रुप अँक्सिडेंट पॉलिसी : रु. 6 लाखावरून 10 लाखपर्यंत करण्यात आले .
- डेथ बेनिफिट : मृत कामगाराच्या कुटुंबियाना मदत म्हणून रु. 20 लाख देण्यात येईल.
- गुणवंत कामगार पुरस्कार : रुपये 11,000/- नव्याने सुरू करण्यात आलेला आहे.
सदर करार यशस्वी करण्यासाठी युनियनच्या वतीने कामगार नेते, शिवगर्जना कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे, युनिट अध्यक्ष अमित लांडगे, उपाध्यक्ष बालाजी खंकाळ, ज.सेक्रेटरी सुदर्शन नांदखिले, खजिनदार दत्ताभाऊ शिंदे, युनिट सदस्य अक्षय सोनवणे तसेच कंपनीच्या वतीने अजय प्रभु (प्लॅन्ट मॅनेजर), राज गावडे (HR हेड), अजय नरे (उत्पादन विभाग प्रमुख) उपस्थित होते.
दाणा इंडिया प्रा.लिमीटेड (Dana India Pvt Ltd.) कंपनीमधील व्यवस्थापनाचा विश्वास व सर्व कामगारांनी केलेले सकारात्मक काम, राखलेला सयंम, सहकार्य यांच्या बळावर हा करार यशस्वी संपन्न झाला .