आळंदी : येथील मरकळ रस्त्यावरील धानोरे तील राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली या कंपनीतील कामगारांना कोरोना काळात असलेल्या निर्देशांचे पालन न करता बेकायदेशीर रित्या कामावरून कमी करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या कामगार हितासाठी कार्यरत कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात कंपनीच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन घोषणा देत सुरु करण्यात आले असुन आंदोलन चालू आहे,अनेक स्थानिक पुढारी पाठींबा देण्यासाठी येत आहेत अशाच प्रकारे शिरूर तालुक्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते,हिवरे येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक श्री विकासनाना गायकवाड यांनी देखील आंदोलन स्थळी भेट देऊन दखल घेतली आहे.
या धरणे आंदोलनात संघटनेचे सभासद राठी ट्रान्सपॉवर प्रा.ली. धानोरे आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली सणसवाडी येथील बडतर्फे १०० कामगारांसह सुमारे १५० वर कामगार सभासद, संघटनेचे पदाधिकारी यांनी बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होत घोषणा देत आंदोलन सुरु ठेवलेले असताना धरणे आंदोलनास आळंदी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या आंदोलना संदर्भात संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी माहिती देत कामगारां वरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार संघटनेने धरणे आंदोलन सुरु केले असून जो पर्यंत कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत धरणे आंदोलन सुरु रहाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी विकासनाना गायकवाड यांनी कामगार नेते कसे असावे तर यशवंतभाऊ भोसले साहेब यांच्या सारखे असावे असे यावेळी सांगितले, कामगारांच्या प्रती इतके संवेदनशील, आणी तळमळ असणारे कामगार नेते यशवंतभाऊ कामगारांच्या पाठीशी असताना कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही,आम्ही सर्व शिरूर तालुक्यातील नेते मंडळी,कामगार वर्ग सदैव आदरणीय यशवंतभाऊंच्या, संघटनेच्या व कामगारांच्या पाठीशी आहोत तसेच न्याय मिळेपर्यंत लागेल ती मोलाची मदत सहकार्य आमच्या कडुन राहील असेही यावळी विकासनाना यांनी बोलताना सांगितले.
राठी ट्रान्सपॉवर इंडिया प्रा.ली धानोरे आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली सणसवाडी या कंपन्यांतील व्यवस्थापनाने कोरोना काळातील शासनाच्या मार्गदर्शक सूचना आदेश नियमांचे उल्लंघन करून सुमारे शंभर कामगारांना कामावरून कमी केले. तसेच कोरोना कालावधीतील वेतन कपात केले. यामुळे कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी कामगार संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाच्या विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुरावे तपासून दाव्यात आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात मनाई केलेल्या कामगारांना परत कामावर घेऊन कपात केलेले वेतन द्यावे असे निर्देश अप्पर कामगार आयुक्त यांनी दिले उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निकाल देण्यात आला होता. मात्र व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही उलट व्यवस्थापनाने सूडबुद्धीने खोटे आरोप लावून ७० कामगारांवर निलंबनाची कारवाई करून बडतर्फ केले. यामुळे उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. यावर निर्णय प्रलंबित असताना राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली या दोन्ही कारखान्यांनी कामगारावर खोटे आरोप लावून दोन्ही कारखान्यातील शंभर कामगारांना निलंबित बडतर्फ केले. त्यामुळे कामगार व कुटुंबीय यांच्यात असंतोषाचे वातावरण व भविष्यातील रोजगार गेलेने आयुष्य उध्वस्त झालेल्या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही कंपनीतील कामगारांना लवकरात लवकर कामावर घ्यावे ल दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी कामगार करत आहेत.
