आळंदी : येथील राठी ट्रान्सपॉवर इंडिया प्रा.ली. धानोरे ( ता. खेड) आणि पॉलीबॉण्ड इंडिया प्रा.ली. सणसवाडी (ता.हवेली) कारखान्यात कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 13 दिवसांपासून धानोरेत कामगारांचे धरणे आंदोलन सुरु आहे.कामगारांच्या न्याय मागण्या संवादातून सोडविण्याची गरज असताना याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. उद्योगपतींनी आपण कामगारांचे जीवावर मोठे झाल्याचे विसरू नये असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले असे वृत्त सामना वृत्तसंस्थेने दिले आहे.
राठी ट्रान्सपॉवर इंडिया प्रा.ली. धानोरे ( ता. खेड) आणि पॉलीबॉण्ड इंडिया प्रा.ली. सणसवाडी (ता.हवेली) मधील कामगारांना कामावरून कमी केल्याने कामगारांनी धानोरेतील कंपनीचे बाहेर रस्त्याचे कडेला 13 दिवसापासून सुमारे 200 वर कामगारांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करताना कामगार नेते भोसले बोलत होते. याप्रसंगी कामगार संघटना युनिट अध्यक्ष विलास ठोंबरे, सचिव पांडुरंग काकडे, सतीश येरंडे, अंकुश सुतार, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे समन्वयक शशांक इनामदार, दीपक पाटील, करण भालेकर, कृष्णा शिखरे आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांचे आंदोलन कंपनी पासून 1 हजार फूट लांब नेण्यासाठी खोटे अर्ज, आरोप केले जात आहेत. उद्योगपती म्हणून जन्माला आलेल्या उद्योगपती यांनी ज्यांचे जीवावर आपण मोठे झालोय. हे विसरू नये. कामगारांना तसेच त्यांच्या न्याय मागण्या मान्य करायचे सोडून त्यांना त्रास देण्याची भूमिका घेणे योग्य नसल्याचे भोसले यांनी सांगितले. कामगार गेल्या 13 दिवसापासून उपाशी, तापाशी राहून उन्हात आंदोलन करीत आहे. येथे धुळीचा, ध्वनी प्रदूषण त्रास सहन करीत आहे. उन्हात रस्त्याचे कडेला बसून सनदशीर मार्गाने शांततेत बारा-बारा तास बसून आंदोलन करीत आहेत.
जो पर्यंत कामगारांच्या घामाला न्याय मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. ज्या कामगारांच्या जीवावर आपण उद्योगपती झालात. त्याच कामगारांना कमी करून त्यांचे जीवावर उठले आहात. कामगार यांच्या न्याय हक्कासाठी चर्चा, संवाद करायचा सोडून त्यांना त्रास देत आहेत हे योग्य नसल्याचे खडसावून सांगत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतराव भोसले यांनी धरणे आंदोलनात मार्गदर्शन केले.
