नाशिक : येथील इलेक्ट्रॉनिका टंगस्टन लिमि (Electronica Tungsten Ltd) कंपनी व्यवस्थापन व महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दि. १७ मे २०२२ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे -
- कराराचा कालावधी : तीन वर्षे चार महिने (दि.1 एप्रिल 2021 ते 31 जुलै 2024)
- एकुण पगारवाढ : रु.9500/-
द्वितीय वर्ष - रु.3325/-
तृतीय वर्ष - रु.2375/-
- उत्पादकता वाढ दहा टक्के असेल.
- फरक रक्कम : रुपये 46 हजार प्रत्येकी दोन टप्प्यात मे आणि जून महिन्याच्या पगारात मिळणार.
करार यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुहास कांदे तसेच कंपनीचे कार्यकारी संचालक अच्युत चासकर यांचे मार्गदर्शन लाभले. करारकरिता व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापक रमेश गडगे, भालचंद्र पाठक, एच. आर राहुल शुक्ल, वित्त व्यवस्थापक चंद्रकांत निकम तसेच कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनील जाधव, सचिव रवींद्र देवरे, कामगार प्रतिनिधी राजू पगार, प्रदीप शेळके, बाजीराव कोठुळे आणि यांनी काम पाहिले. करारावेळी सहाययक कामगार आयुक्त शर्वरी पोटे उपस्थित होत्या.
