पुणे : व्होडाफोन- आयडिया कंपनी मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा पुरवणारी अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचे लाखो ग्राहकांना सेवा पुरवण्याचे काम करते. या कंपनीत लाखो ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यासाठी मोबाईल टाॅवरचे महत्वपूर्ण काम असते. या टाॅवरचे देखभाल, दुरुस्ती, दैनंदिन देखभाल करण्यासाठी सन 1998 पासून नाममात्र कंत्राटदार व्दारे कामगार कंपनी मध्ये कार्यरत नियमीत सेवेत असणाऱ्या कामगारांना पुर्व सुचना, नोटीस न देता नाममात्र कंत्राटदार प्रिझम सर्व्हीसेस प्रॉपर्टी सोल्युशन प्रा. लि कोथरुड पुणे कंपनी ने दि 2 सप्टेंबर 2021 रोजी ईमेल व्दारे कामगारांची सेवा संपुष्टात आणली. या सोबत कामगारांना देय रक्कम दिलेली नाही.
सदरील बाब चुकीचे व बेकायदेशीर असून कामगार कायद्यातील तरतूदी चा भंग करणारे असल्यामुळे ठेकेदार कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने मागील सेवाशर्ती सह पूर्ववत कामावर घेण्याची मागणी केली आहे. तसेच कामगारांना पुर्ववत कामावर घेण्यासाठी व्होडाफोन - आयडिया कंपनीच्या शारदा सेंटर कार्यालय पुणे समोर तीव्र निदर्शने केली. या कामगारांना त्वरित न्याय न मिळाल्यास कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा (दि.28 मार्च) ठेकेदार कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.
मागील काळात कंपनी मध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त कामगार व विविध एजन्सी वतीने महाराष्ट्रात कार्यरत होते. पण कंपनीने टप्याटप्याने कामगार संख्या कमी केली. कामगारांनी कंपनी च्या प्रगतीसाठी व विकासासाठी मोठे योगदान दिले होते. दि 2 सप्टेंबर 2021 रोजी कमी केलेल्या कामगारांनी कोविड लाॅकडाऊन कालावधीत सतत कार्यरत राहुन, स्वतःच्या, कुटुंबाची जिवाची पर्वा न करता सतत कार्यरत राहुन समाज हिताचे महत्वपूर्ण काम केले आहे. पण या योगदानाचा विचार न करता व्यवस्थापनाने कामगारांना कामावरून बेकायदेशीररित्या कमी केल्या बद्दल नाराजी व रोष व्यक्त केला.
निदर्शने नंतर व्होडाफोन- आयडिया कंपनी, प्रिझम सर्व्हीसेस व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी यांच्या समावेत चर्चा झाली व कामगारांना देय रक्कम, नुकसान भरपाई इ. कामगारांच्या् प्रलंबित प्रश्न समजुन घेवून लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कंपनी च्या वतीने देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व ठेकेदार कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) सरचिटणीस सचिन मेंगाळे, कामगार प्रतिनिधी नवनाथ गुंडगळ, प्रदीप कोंढाळकर, अनिल किर्दक, रूपेश बारसकर, सुधीर जोशी यांनी केले. या आंदोलनात अर्जुन चव्हाण अध्यक्ष भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके यांनी मार्गदर्शन केले.