थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लिमि (Thyssenkrupp Industries India Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : पुणे येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लिमि (Thyssenkrupp Industries India Pvt. Ltd.)  कंपनी व्यवस्थापन आणि थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • सदर करार दि.1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2024 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.

  • प्रत्येक कामगाराला महिन्याला रु.19,001/- पगार वाढ

  • मेडिक्लेम पॉलिसी रु.4,00,000/- करण्यात आली, दुप्पट बफर योजना तसेच 1 लाख रुपयांचा वाढीव विमा, सेवानिवृत्त व व्ही.आर.एस.घेणाऱ्या कामगारांना वयाच्या 100 वर्षापर्यंत मेडिक्लेम विमा सुरु राहणार.

  • सेवानिवृत्त कामगाराने रिटायरमेंट फंड म्हणून रक्कम रु.5,50,000/-  

  • ग्रॅज्युटी 21 दिवसांची करण्यात आली. 

  • घर खरेदीसाठी 5 लाख रुपये व बँक हाऊसिंग लोन साठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

  • शैक्षणिक कर्ज, विवाह कर्जाच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आली.

  • व्यवस्थापन व कामगार यांच्यात चांगल्या संबंधांबद्दल व्यवस्थापनाने प्रत्येक कामगारास एक रकमी रुपये 15,001/- देण्याचे ठरवले.

  • या करारामुळे कायम कामगारांना 94 हजार ते 1 लाख 6 हजार रुपये इतका पगार झाला आहे. 

      करारावेळी व्यवस्थापनातर्फे विवेक भाटिया (एम.डी अँड सिईओ), पुलकित गोयल (सी.एफ.ओ), सुहास तलाठी (मॅन्युफॅक्चरिंग हेड), शिल्पा छाब्रिया (एच.आर.हेड), मनोज राणे (आय.आर), शितल कुलकर्णी (लिगल हेड) तसेच युनियन तर्फे अध्यक्ष रामचंद्र वाईगडे, जनरल सेक्रेटरी विपुल बिरंजे, खजिनदार सोनबा गव्हार, इतर युनियनचे पदाधिकारी अनिल गोडसे, विजय माळी, निरज सनस यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या या वेतन करारासाठी नागेशकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.