तळेगाव,पुणे : तळेगाव MIDC येथील चासिस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स प्रा.लिमि (Chasys Automotive Components Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि पै.विश्वनाथ भेगडे जनरल व माथाडी कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार दि.2 ऑक्टोबर 2021 रोजी संपन्न झाला.
सदर वेतनवाढ करार हा संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर संघटनेच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघटनेच्या हितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे 18 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुर्णतः आनंदी वातावरणात पार पडला. सदर करार पै.विश्वनाथ भेगडे जनरल व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष लहुमामा शेलार व सरचिटणीस शांताराम टकले यांच्या उपस्थितीत पार पडला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- सदर करार दि.1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी लागू असेल.
- 3 वर्षासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रु. 12,000/- इतकी पगारवाढ मिळणार आहे.
महागाई भत्ता :
प्रत्येक वर्षी जानेवारी व जुलै महिन्यात वर्षातून 2 वेळा महाराष्ट्र शासन "इंजिनीरिंग इंडस्ट्री" साठी जाहीर केलेला भत्ता पगारात वाढ होणार आहे.
एल. टी. ए भत्ता :
दर महिन्याच्या बेसिकचा 12 वा भाग
मेडिकल भत्ता :
दर महिन्याच्या बेसिकचा 12 वा भाग
रजा :
EL रजेमध्ये 2 रजांनी वाढ करण्यात आली.
बोनस :
बेसिक व महागाई भत्ता (स्पे.अलाऊन्स) च्या 8.33% व एक बेसिक सॅलरी, मिठाई साठी रु. 500/- रोख असे सरासरी 45000 - 50000/- एवढा मिळणार आहे.
सदर करारावेळी कंपनीच्या वतीने चलही किम (एमडी), मिनसु किम (सीएफओ), गुरुराज सावडी (सिनि.फायनसन्स मॅनेजर), उमेन्द्र सिन्हा (सिनि एचआर मॅनेजर), अजिंक्य दाभाडे (वेल्ड शॉप हेड), निलेश माने (प्रेस शॉप हेड), व्ही.डी.व्हरनेकर (सल्लागार) तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष वैभव येवले, उपाध्यक्ष अभिजित पाटील, सेक्रेटरी देवेंद्र बेंडाळे, सदस्य धनंजय माळी दिलीप साळुंके उपस्थित होते.
सदर करारासाठी टाटा मोटर्स एम्प्लॉयज युनियनचे कामगार नेते महेंद्र कदम सर यांचे मोलाचे विशेष सहकार्य व ओग्नेबेनी इंडिया प्रा.लिमि युनियनचे अध्यक्ष रघुनाथ गोरड, संतोष मोहिते व इतर पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
संघटनेच्या सर्व कामगारांनी राखलेला संयम व दिलेले सहकार्य तसेच महत्त्वाचे म्हणजे संघटना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर ठेवलेला विश्वास या सर्व बळावर करार संपन्न झाला.
