सणसवाडी,पुणे : सणसवाडी येथील ॲक्टिव क्रोम वेल प्रा.लिमि (Active Chromewell Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन व ऍक्टिव्ह कामगार संघटना यांच्यामध्ये दुसरा वेतन वाढ करार दिनांक दि.28 सप्टेंबर 2021 रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- सदर करार दि.1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2024 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.
पगार वाढ :
- कॅटेगरी 1
दुसरे वर्ष 2022 - रु.4000/-
तिसरे वर्ष 2023 - रु.2000/-
- कॅटेगिरी 2
दुसरे वर्ष 2022 - रु.3000/-
तिसरे वर्ष 2023 - रु.1500/- इतका पगार वाढ देण्यात आला.
- 1 एप्रिल 2021 पासून 100% फरक देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले.
रजा आणि पगारी सुट्ट्या :
आजारी रजा - वर्षाला 7 दिवस देण्यात आल्या आहे.
किरकोळ रजा - वर्षाला 7 देण्यात आल्या आहे.
फेस्टिवल हॉलिडे - 8 देण्यात आल्या आहेत.
पितृत्व रजा आणि शोक रजा - वर्षाला 3 देण्यात आले आहेत.
उपस्थिती भत्ता : महिन्याला रुपये 900/- मान्य करण्यात आला.
मेडिक्लेम इन्शुरन्स : युनियन मधील कामगारांना रु.2,50,000/- मान्य करण्यात आला. त्यामध्ये स्वता:, पत्नी व दोन मुले यांचा समावेश करण्यात आला
लॉस ऑफ वेजेस : जर काही कारणास्तव कंपनीच्या बाहेर जर अपघात झाल्यास पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी मध्ये समावेश करण्यात आला आहे सदर पॉलिसीमध्ये एक्सीडेंट मुळे मृत्यू झाल्यास रु.5,00,000/- इन्शुरन्स मार्फत देण्यात येणार आहे.
डेथ पॉलिसी : एखाद्या कामगाराचा कसल्याही प्रकारचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून रु.10,00,000/- देण्याचे मान्य करण्यात आले आहे. व तसेच कायम स्वरूपी कामगार व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन व एकूण वेतनाची तितकीच रक्कम कंपनीकडून कामगाराच्या वारसास देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी : वर्षातून एक वेळा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
शिफ्ट भत्ता : नाईट शिप ला रु.50/- प्रति दिवस देण्यात येईल.
बोनस : मूळ वेतन व महागाई भत्ता मिळून 15% रक्कम पुढील तीन वर्षासाठी मान्य करण्यात आली
दिवाळी भेटवस्तू : एक हजार रुपये किमतीचे भेटवस्तू देण्याचा मान्य करण्यात आली आहे.
बँक कर्ज हमीपत्र : वैयक्तिक कर्ज प्रकरणी अंडरटेकिंग लेटर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
आगाऊ वेतन : एक महिन्याचा पगार आगाऊ वेतन म्हणून देण्याचे मान्य करण्यात आले.
रेनकोट व स्वेटर : दरवर्षी सुरुवातीला एक भेटवस्तू म्हणून मान्य करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलन : कंपनी प्रतिनिधी व युनियन प्रतिनिधी यांच्या झालेल्या चर्चेमध्ये वर्षातून एक वेळेस स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे
दिवाळी मिठाई : कंपनी प्रतिनिधी व युनियन प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार दिवाळी आणि दसरा या दिवशी अर्धा किलो मिठाई देण्याचे मान्य करण्यात आले.
शाखेतून बदली : युनियन प्रतिनिधी आणि कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार एखाद्या कामगारास एका शाखेतून दुसर्या शाखेत बदली करायचे असल्यास त्याला दरमहा रु.2500/- देण्याचे मान्य करण्यात आले आहे
नविन 9 कामगारांना संघटने मध्ये समावेश करून घेण्यात आले.
सदर करारावेळी कंपनीच्या वतीने संजय कपूर (डायरेक्टर), सुरेश सोनवलकर (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर), मनीष कोरडे (व्हाईस प्रेसिडेंट), सुरेश शिंदे (जनरल मॅनेजर एन पी डी), मनोज बन्सीले (डेप्युटी जनरल मॅनेजर उत्पादन आणि गुणवत्ता), संजय शिंदे (वरिष्ठ व्यवस्थापक आणि मॅन्युफॅक्चरिंग), सीमा केदारी (डेप्युटी मॅनेजर एच आर एडमिन) व युनियन वतीने अध्यक्ष गणेश पिंपळे, उपाध्यक्ष विलास गोडसे, जन.सेक्रेटरी विद्यानंद कोठुळे, सह सेक्रेटरी प्रकाश बगाटे, खजिनदार नारायण कणसे,संघटक मनोज गायकवाड, सदस्य- सागर नेवसे, स्वीकृत सद्स्य रमेश सातपुते यांनी काम पहिले. तसेच करारासाठी मार्गदर्शन राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष किशोर ढोकले यांनी केले.
संघटनेच्या सर्व कामगारांनी राखलेला संयम व दिलेले सहकार्य तसेच महत्त्वाचे म्हणजे संघटना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर ठेवलेला विश्वास या सर्व बळावर करार संपन्न झाला.
