सिंटेक्स बी.ए.पी.एल कंपनीतील कामगारांनी स्थगित केले उपोषण

कामगार नेते,राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली माहिती

सणसवाडी पुणे : येथील सिंटेक्स बी.ए.पी.एल कंपनीला 12 फेब्रुवारी 2021 रोजी लागलेल्या आगी मध्ये  इंजेक्शन मोल्डिंग मशिनरी जाळून खाक झाली होती याबाबत कामगारांमध्ये संशयाचे वातावरण असताना या आगी बाबत चौकशी व्हावी व कंपनी पूर्ववत सुरु करावी या मागणीसाठी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अप्पर कामगार आयुक्त पुणे, सह संचालक औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय यांना पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे कामगारांनी दि. 25 ऑक्टोबर 2021 पासून प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.

याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून संघटनेबरोबर काल (दि. 23 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये खालील मुद्दे कंपनीने मान्य केले

  • कंपनीत लागलेल्या आगी संदर्भात संबंधित शासकीय संस्था तपास करत असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आढळून आलेल्या वस्तुस्थितीचा अहवाल संघटनेला देण्यात येईल.

  • कंपनी सुरु करणे याबाबतचा निर्णय कंपनीच्या वरिष्ठ पातळीवर होईल त्याबाबत संघटनेला कळविण्यात येईल येईल.

  • कारखान्याला आग लागल्यानंतर दि.21 फेब्रुवारी 2021 पासून कामगारांना काम उपलब्ध करून दिले असून त्यांना कार्यरत ठेवले आहे. तसेच कामगारांना दर महिन्याला वेतन देखील देण्यात येत आहे. भविष्यातही कामगारांचे नुकसान होणार नाही याबाबत कामगार व कामगार संघटना सोबत चर्चा करून सकारात्मक उपाययोजना करण्यात येतील.

      वरीलप्रमाणे कंपनीने लेखी कळविले व प्राणांतिक उपोषण स्थगित करावे असे संघटनेला आव्हान केले तसेच कंपनी व्यवस्थापन व पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या आवाहनानुसार तूर्तास संघटनेने उपोषणाचा निर्णय स्थगित केला असून दि.12 नोव्हेंबर 2021 बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास दि. 13 नोव्हेंबर 2021 पासून उपोषण करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.