सप्टेंबर २०२० मध्ये केंद्राचे उद्घाटन झाले. त्यानंतर डिसेंबरपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला. आतापर्यंत वेल्डिंग आणि रेफेक्टरी ब्रिक्स असे दोन अभ्यासक्रम सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यात केवळ चार महिन्यांच्या कालावधीत चाळीस जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचा फायदा कौशल्याधारित कामगार तयार करण्यासाठी होत आहे.
नागपूर : बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (Butibori Manufacturers Association) (बीएमए) (BMA) सुरू केलेल्या प्रशिक्षण केंद्राला राज्य सरकारने बुटीबोरी एमआयडीसीमध्ये (Butibori MIDC) एक रुपया लीजवर जागा दिली आहे. कुठल्याही एमआयडीसीतील उद्योग प्रकल्पांच्या संघटनेने कॉमन ट्रेनिंग सेंटर (common training center) सुरू करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून त्यासाठी त्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.
मोठ्या उद्योग प्रकल्पांची स्वत:ची प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यांद्वारे भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षित करण्यात येते. मात्र, औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या उद्योग प्रकल्पांनी एकत्र येत कॉमन ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा अभिनव प्रयोग बुटीबोरीत सुरू आहे. सध्या हे केंद्र एका तात्पुरत्या जागेवर सुरू आहे.
केंद्रासाठी कायमस्वरूपी जागेची मागणी सरकारकडे करण्यात आली. त्यानुसार केंद्राला बुटीबोरी एमआयडीसी परिसरात दहा हजार स्क्वेअरफूट जागा देण्यात आली आहे. ज्यावर अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर तसेच चाळीस जणांची राहण्याची सोय होऊ शकेल, अशी निवास व्यवस्था उभारण्यात येणार आहे, अशी माहिती बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी दिली.
सप्टेंबर २०२० मध्ये केंद्राचे उद्घाटन झाले. त्यानंतर डिसेंबरपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला. आतापर्यंत वेल्डिंग आणि रेफेक्टरी ब्रिक्स असे दोन अभ्यासक्रम सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ चार महिन्यांच्या कालावधीत चाळीस जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचा फायदा कौशल्याधारित कामगार तयार करण्यासाठी होत आहे.
इलेक्ट्रिशिअन, पेंटर, मेसन या वर्गात येणारे अनेक जण असे आहेत, ज्यांनी कुठेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. केवळ दुसऱ्यांचे काम पाहून हे लोक शिकले आणि आता स्वत:चा व्यवसाय करून राहिले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रमाणित करण्यासाठी बीएमएने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत बुटीबोरी परिसरातील लहान-मोठ्या गावांमधील अशा छोट्या व्यावसायिकांना शोधून त्यांना तांत्रिक शिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्याचा लाभ त्यांना स्वत:चा व्यावसाय वाढविण्यासाठी होणार आहे. तसेच त्या प्रमाणपत्राच्या आधारे हे लोक चांगल्या कंपनीमध्ये नोकरीदेखील मिळवू शकणार आहेत. या उपक्रमासाठी कॅल्डीरीस ही आंतरराष्ट्रीय कंपनी तसेच 'प्रथम' सामाजिक संस्था सहकार्य करत आहेत.