शिक्रापूर,पुणे : कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या हस्ते राष्ट्रीय श्रमिक आघाडी या कामगार संघटनेच्या शिरूर तालुका संपर्क कार्यालयाचे गुरूवार दि.२१ ऑक्टोंबर २०२१ शिक्रापूर येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला,त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष रेवणनाथ गायकवाड ,भाजपा आघाडी चे जयेश शिंदे, शिवसेनेचे समाधान डोके, नितीन दरेकर, युवा मोर्चा चे रोहीत खैरे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रोकडे, उद्योजक दिपक पाटील, सचिव अमोल घोरपडे, अमोल कुंभार, बाबुराव वाळके, सोमनाथ गायकवाड, अभय चव्हाण, पांडुरंग काकडे, मच्छिंद्र गायकवाड इ. युनियन प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते.
यावेळी भोसले यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले व सदैव कामगारांच्या पाठीशी राहुन न्याय मिळवून देऊ तसेच गेली ३० वर्ष कामगार चळवळीत राज्यभर काम करत असताना ५७००० हजारांच्या वर कामगारांना पर्मनंट करून न्याय मिळवून दिले. कल्याणीनगर पासून रांजणगाव पर्यत पुणे नगर रोड पट्ट्यातील औद्योगिक वसाहती मधे कामगार चळवळीची सुरुवात केली व ७००० हजारांच्या वर कामगारांना राष्ट्रीय श्रमीक आघाडी च्या माध्यमातून पर्मनंट केल्याची माहीती त्यांनी सांगितली.
कामगारांची कशा प्रकारे उद्योगपती व स्थानिक पुढारी मिळुन पिळवणुक करतात, त्यावर वारंवार आम्ही आवाज उठवत आहोत तसेच राज्यभर आम्ही स्थानिकांसाठी लढत आहोत, या पुढील काळात राज्यभर तीव्र स्वरूपाचे प्रचंड आंदोलन राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून उभे करणार आहोत असे यशवंत भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.