मुंबई : भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते, कामगार नेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेउन (दि.२४ सप्टेंबर) उद्योग क्षेत्रातील कामगारांसाठी कोविड-19 वेळ किती कठीण आहे हे सांगितलं तसेच “शिवसेना - अस्मिता, संघर्ष, वाटचाल” हे पुस्तक भेट दिले.
कामगार नेते व शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक हे महाराष्ट्रातील किमान वेतन सल्लागार समितीचे (MWAC) प्रमुख असल्याने, त्यांनी कोश्यारींना किमान वेतन धोरण, नवीन यंत्रणा आणि अंमलबजावणीबद्दल समजावून सांगितले. असंघटित आणि आयटी क्षेत्रासाठी विविध कामगार समस्या आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनाबद्दल माहिती दिली. विशेषतः उद्योग क्षेत्रातील कामगारांसाठी कोविड-19 वेळ किती कठीण आहे हे सांगितले. यावेळी प्रफुल सारडा आणि राहुल बोहरा उपस्थित होते.
