स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील एमआयडीसी कंपनी मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकर्‍या द्या तसेच रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले असे वृत्त इंडिया रिअल वृत्तसंस्थेने दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे टाकवे बुद्रुक,कान्हे फाटा,लोणावळा तळेगाव,आदी ठिकाणी एमआयडीसी कंपनी असून या कंपन्यांमध्ये अनेक परप्रांतीय बाहेरचे कामगार असल्यामुळे मावळ तालुक्यातील गोरगरीब भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. तसेच स्थानिक कामगारांना मानसिक त्रास देऊन कामावरून काढत आहे. संबंधित कंपन्यांमध्ये नोकरी खाली असून हेतूपुरस्पर स्थानिक कामगारांना डावलण्यात येत आहे.

अधिकारी वर्ग स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून काढून आपल्या मर्जीतील कामगारांना काम देत आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. याबाबत तहसीलदारांनी स्वतः लक्ष घालून याबाबत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.स्थानिक बेरोजगारांना सामावून घेण्यासाठी शिवसेना निर्णायक भूमिका घेणार असून भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही.

यावेळी मावळ तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुळावले,महिला आघाडी च्या शदाना चौधरी अनुताई गोण्ते शिवसेनेचे उपप्रमुख सुरेश गायकवाड उपतालुकाप्रमुख मदन शेडगे,युवा सेना अध्यक्ष अनिकेत घुले,आशिष ठोंबरे, अमित कुंभार वडगाव शहर प्रमुख राहुल नखाते,तालुका उपप्रमुख अनिल ओव्हाळ,शहर प्रमूख बाळासाहेब फाटक,संतोष ढोरे योगेश खांडभोर आदी शिवसैनिक उपस्थित होते.