नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ग्राहकांना EPF खाते आधारशी जोडण्याच्या बाबतीत काही दिलासा दिला आहे. लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी त्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती.
जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत EPFO आणि आधार क्रमांक लिंक केले नाहीत, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. या व्यतिरिक्त, तुम्हाला EPF खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. जर EPF खातेधारकाचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर ते EPFO च्या सेवा वापरू शकणार नाहीत.
PF Account सोबत Aadhaar जोडण्याची पद्धत :
- www.epfindia.gov.in वेबसाईट ओपन करा.
- Services मध्ये - For Employees वरती क्लिक करा.
- Member UAN/Online services वरती क्लिक करा.
- यानंतर UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा.
- त्यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC या पर्यायावर क्लिक करा.
- याठिकाणी तुम्हाला EPF अकाउंटमध्ये आधारसह कोणती कागदपत्र जोडणं आवश्यक आहे ते दिसेल याठिकाणी आधारचा पर्याय निवडून आधार नंबर आणि आधारवरील तुमचं नाव टाइप करुन Save करा.
- यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल आणि तुमचं आधार UIDAI डेटाशी व्हेरिफाय होईल.
- तुम्ही दिलेली KYC दस्तऐवज बरोबर असल्यास तुमचे आधार तुमच्या EPF खात्याशी जोडले जाईल. आणि तुम्हाला तुमच्या आधार माहिती समोर “Verify” लिहिलेले मिळेल.
