महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदुर संघ यांनी दिली माहिती
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पुणे या मंडळात किमान २८०० नोंदीत सुरक्षा रक्षक विविध आस्थापनामध्ये काम करत आहेत. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक ( नोकरीचे नियमन आणि कल्याण) अधिनियम १९८१ त्याअंतर्गत योजना २००२ व २००५ ही सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे, सेवाशर्तीचे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण करते.
परंतु बार्टी पुणे येथील आस्थापनेने सुरक्षा रक्षकांच्या बदल्या करण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाला कळविले असुन मंडळाचे अध्यक्ष यांनी कुठलीच चौकशी न करता बदल्यांची कारवाई चालु केली आहे. अस्थापनेत २ ते ४ वर्ष झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या बदल्या मंडळ कोणत्या कायद्यानुसार करत आहे.आज अस्थापनेत ४५ ते ५६ वर्ष वय झालेले सुरक्षा रक्षक काम करत आहेत त्यांच्या बदल्या केल्या आणि तर दुसरी आस्थापना त्यांना स्वीकारेल का ? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंडळाचे बदल्यांबाबत ४५ ते ५५ वर्ष वय झालेल्या सुरक्षा रक्षकांनसाठी कोणती मार्गदर्शक तत्वे आहेत. फक्त बदल्या करायच्या आणि सुरक्षा रक्षकांना बेरोजगार करायचे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.
सुरक्षा रक्षक बदली याविषयी मंडळाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केले पाहिजे. मंडळ स्थापन १६ वर्षे उलटून गेली सुरक्षा रक्षकांना भविष्य निर्वाह निधी वरील योजनांचा लाभ मिळत नाही. वेतनातून ESIC चे अंशदान कपात करतात पण भरले जात नाहीत. उपदान प्रदान अधिनियम १९७२ मधील विमा लागु केला नाही.कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ मिळत नाही.इतक्या दयनीय अवस्थेमध्ये सुरक्षा रक्षक जगत आहे.
सुरक्षा रक्षकांना राष्ट्रीय सुट्टया चे पगार अतिकलिक दराने मिळत नाही.त्या दिवशी सुट्टी घेतली तर त्या दिवसाचा पगार मिळत नाही. तसेच वार्षिक भरपगारी रजा १५.५, रुग्णात रजा ३०, नैमित्तिक सुट्टया ८, राष्ट्रीय सुट्टया ८ मिळाल्या पाहिजे.
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन आणि कल्याण) (सुधारित) योजना २००५ ची अंमलबजावणी केली नसल्याने मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांची भरती केल्याने प्रतीक्षा यादी वाढत आहे. २००५ च्या योजने नुसार प्रमुख मालक स्वतः ची व ठेवलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी मंडळाने विहित केलेल्या फॉर्म नोंदणी घेऊन सुरक्षा रक्षक आहे त्याच ठिकाणी कार्यरत राहतो. मग बदली कशी केली जाते. म्हणुन सुरक्षा रक्षकांच्या बेकायदेशीर होणाऱ्या बदल्या व इतर प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्यासाठी दि.३ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदुर संघाने दिली आहे.