कंपनीच्या वतीने मालमत्ता व यंत्रसामुग्री विक्री अथवा स्थलांतर करणार नाही असे न्यायालयात हमी पत्र (undertaking)
पुणे : जनरल मोटर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या (General motors India Pvt Ltd) व्यवस्थापनाने मागील दोन वर्षापासून या ना त्या कारणाने कामगारांना काढून टाकण्यासाठी प्रथम स्वेच्छानिवृत्ती योजना आखली होती, त्यास कामगार बळी न पडल्यामुळे १२ जुलै २०२१ रोजी अचानक १०८६ कामगारांची बेकायदेशीर कपात केली आहे.
सदरची व्यवस्थापनाची कृती ही बेकायदेशीर असल्याने त्याविरुद्ध जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या वतीने औद्योगिक न्यायालय पुणे यांच्याकडे १५ जुलै २०२१ रोजी तक्रार अर्ज (unfair labour practice) क्रमांक १५५/२०२१ द्वारा दाद मागितली आहे.
सदरच्या तक्रार अर्जावर १६ जुलै २०२१ रोजी सुनावणीदरम्यान कंपनीला मालमत्ता व यंत्रसामुग्री विक्री करण्यास मनाई हुकुम देण्याची मागणी युनियन च्या वतीने विधी तज्ञ अॅड. नितीन कुलकर्णी यांच्यातर्फे करण्यात आली असता, पुढील सुनावणी होईपर्यंत कंपनी आपली मालमत्ता व यंत्रसामुग्री विक्री अथवा स्थलांतर करणार नाही अशी कंपनीच्या वतीने हमी पत्र (undertaking) दिलेले आहे. पुढील सुनावणी ३ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.
युनियनच्या वतीने विधी तज्ञ अॅड. नितीन कुलकर्णी तर कंपनीच्या वतीने अॅड. राजीव जोशी हे काम पाहत आहे, अशी माहिती युनियन च्या वतीने देण्यात आली.