कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Esic) Covid-19 मदत योजना

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Esic) यांच्या माध्यमातून कोरोना काळात covid-19 मदत योजना (esic covid-19 relief scheme) जाहीर करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे :

  • ही योजना एक कल्याणकारी योजना आहे ज्याचा उद्देश कर्मचारी राज्य विमा कायद्याअंतर्गत सुरक्षित असलेले कामगार जे दुर्दैवाने covid-19 ला बळी पडले आहेत, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना मासिक पेन्शनच्या स्वरूपात रोख फायदे प्रदान करणे आहे.

  • हे दिनांक 24 मार्च 2020 पासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी पूर्वलक्षीरित्या लागू होईल.

  • covid-19 आजारामुळे मृत्यू झालेल्या विमा धारकाची नोंद covid-19 चे निदान होण्याच्या की ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, किमान तीन महिने आधी करावी ऑनलाइन पोर्टल वर नोंदविलेली असावी. या योजनेत covid-19 आजारातून बरे झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत होणाऱ्या covid-19 संबंधित मृत्यूला देखील कव्हर करण्यात आले आहे.

  • मृत विमा धारक व्यक्ती covid-19 रोगाच्या निदानाच्या तारखेला नोकरीत असली पाहिजे आणि covid-19 रोगाचे निदान होण्यापूर्वी ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, जास्तीत जास्त एक वर्षाच्या कालावधीत त्या संबंधित किमान 70 दिवस केलेल्या कामाचा भत्ता दिलेला किंवा देय असावा. 

  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा संपूर्ण दर मृत व्यक्तीच्या आश्रितांमध्ये वितरित केलेल्या सरासरी वेतनाच्या 90 % असेल जे पैसे त्यांच्या थेट बँक खात्यात पाठविले जातील, तर योजनेअंतर्गत किमान लाभ दरमहा 1800/- रुपये असेल. 

  • मृत कर्मचाऱ्यांच्या जोडीदार वर्षाकाठी रुपये 120/- च्या नाममात्र योगदानावर वैद्यकीय सेवेसाठी पात्र आहे.

  • पात्र आश्रित covid-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट व मृत्यु प्रमाणपत्रांसह त्यांचे दावे जवळच्या शाखा कार्यालयात सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखा कार्यालय / उपप्रादेशिक कार्यालय / क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधा.