कामगार मंत्रालयाने नोटिफाय केली स्कीम - ESIC Covid-19 Relief Scheme
नवी दिल्ली : एम्प्लॉई स्टेट इन्श्युरन्स कॉर्पोरेशन(Employee State Insurance Corporation) म्हणजे ईएसआयसी (ESIC) ने अलिकडेच कोविड-१९ रिलीफ स्कीम (ESIC Covid-19 Relief Scheme) ला मंजूरी दिली होती.
स्कीमचा हेतू ईएसआईसी (ESIC Covid-19 Relief Scheme) कार्ड होल्डरचा कोरोनाने मृत्यु झाल्यास त्याच्या अवलंबितांना मदत उपलब्ध करून देणे आहे. ईएसआयसीच्या कक्षेत येणार्या इंश्युअर्ड कर्मचार्याचा कोरोनाने मृत्यू झाला तर ईएसआयसीकडून त्याच्या अलंबितांना किमान १८००/- रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. आता कामगार मंत्रालयाने (Labour Ministry) ने कोविड-१९ रिलीफ स्कीमला नोटिफाय केले आहे.
ईएसआयसीचे इन्श्युरंस, रेव्हेन्यू अँड बेनिफिटचे एम. के. शर्मा यांनी म्हटले की, या स्कीम अंतर्गत अर्ज करणार्या कुटुंबांना मृत कर्मचार्याची सॅलरी मिळेल. म्हणजे ईएसआयसीमध्ये योगदान देणार्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबात पत्नी, मुले, अलंबून असणारे आई-वडील किंवा भाऊ-बहिण यांना दर महिना कर्मचार्यांची अंतिम सॅलरीच्या ९० टक्के पैसे दिले जातील.
कोणत्याही कंपनीत एक वर्षाच्या आत किमान ७० दिवसाचे ज्यांनी ईएसआईसीमध्ये योगदान दिले असेल, अशा कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळेल. याशिवाय कर्मचारी कोविड झाल्याच्या तीन महिने अगोदरपर्यंत कोणत्याही कंपनीचा कर्मचारी असणे आवश्यक आहे. या दरम्यान जर त्यास कोरोना झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला या योजनेसाठी पात्र मानले जाईल.