इमर्सन कंपनी (Emerson Climate Technologies India Pvt Ltd, Atit) येथे वेतनवाढ करार संपन्न

इमर्सन कंपनी (Emerson Climate Technologies India Pvt Ltd, Hinjewadi, Atit Plant) आणि इंजिनिअरिंग श्रमिक संघटना, अतीत ता.जि.सातारा यांच्या मध्ये १५,१००/- रुपयांचा वेतनवाढीचा करार संपन्न झाला. 

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे: 

  • वेतनवाढ कराराचा कालावधी ३ वर्षे १० महिने (१८ ऑगस्ट २०२० ते १७ जून २०२४)

  •  १८ ऑगस्ट २०२० पासून ३१ मे २०२१ पर्यंतचा पगाराचा फरक सर्व पात्र कामगारांना दिला जाईल.

  • वेतनवाढ : 

              रु. ११,०००/- रुपये CTC १८ ऑगस्ट २०२० ते १७ जानेवारी २०२२
              रु. २,०००/- रुपये CTC १८ जानेवारी २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३
             रु. २,१००/- रुपये CTC १८ ऑगस्ट २०२३ ते १७ जून २०२४

  •  मेडिक्लेम कव्हरेज : १,००,०००/- रुपये वरुन १,५०,०००/- रुपये (कामगार स्वतः, पत्नी व २ मुले) 

  • टि शर्ट : प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात १ टि शर्ट देण्यात येईल.

  • आजारी रजेची साठवणूक : ६२.५(फुल्ल) ऐवजी ५० (फुल्ल) करण्यात आली आहे.

  • उत्पादकता : १.कामगारांकडून पहिल्या व दुसऱ्या पाळीमध्ये ४१० मिनिटा ऐवजी ४३० मिनिटाचे आणि तिसऱ्या पाळीमध्ये ३३० मिनिटा ऐवजी ३५० मिनिटाचे प्रत्यक्ष उत्पादन दिले जाईल.

  • रिपोर्ट रायटिंग : कामगारांनी आपल्या विश्रांती च्या वेळेत रिपोर्ट रायटिंग करावयाचे आहे.

  • शिफ्ट वेळ : 

          पहिली पाळी सकाळी ०८:०० ते ०४:३०
          दुसरी पाळी दुपारी ०४:३० ते ०१:०० 
           तिसरी पाळी रात्री ०१:०० ते ०८:००

  • क्वालिटी अँशुरन्स (QA1 Grade) व क्लेरीकल ग्रेड (C1 Grade) : संबंधीत विभाग प्रमुखांच्या मंजुरीने क्वालिटी अँशुरन्स (QA1 Grade) व क्लेरीकल ग्रेड (C1 Grade) मध्ये कोणाला समाविष्ट करण्यात यावे हे ठरविले जाईल.

  • Fatigue Time (विश्रांती वेळ) : सद्या प्रमाणे पहिल्या व दुसऱ्या पाळीमध्ये ५० मिनिटे व तिसऱ्या पाळीमध्ये ४० मिनिटे फटिग दिला जाईल.

यावेळी व्यवस्थापन वतीने कार्पोरेट हेड बिमल खेडकर सर, एच आर डायरेक्टर देवेंद्र झोपे  सर यांना कोव्हिड १९ च्या महामारीमूळेकंपनीने प्रवासाला प्रतिबंध केल्यामूळे हजर राहता आले नाही , त्यांच्या अनुपस्थितीत फँक्टरी मँनेजर शरद परांजपे सर, आबासाहेब पाटील सर, सचिन खटावकर सर, शिर्के सर, मोरे सर, विक्रम देशपांडे सर व संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र यादव, जनरल सेक्रेटरी सुजित साळुंखे, उपाध्यक्ष बाजीराव  पानस्कर, सह जनरल सेक्रेटरी  प्रफुल्ल पोळ, खजिनदार प्रवीण घोरपडे आणि सदस्य गणेश कांबळे, वैभव ढाणे, उदय यादव, आरिफ काझी,संजय पवार, हरिभाऊ जगताप, रमेश देसाई, विजय जाधव यांच्या उपस्थितीत तसेच संघटना सल्लागार नितीन कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार संपन्न झाला. यावेळी संघटनेच्या वतीने खजिनदार प्रवीण घोरपडे यांनी सर्व संघटना सभासद व व्यवस्थापन यांचे आभार मानण्यात आले.

अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा