कामगार हक्क अधिकर प्राप्ती केंद्राच्या वतीने आशा वर्कर यांना हेल्थ किटचे वाटप

बारामती : जनविकास संस्था यांच्या माध्यमातून बारामती या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कामगार हक्क अधिकार प्राप्ती हमी केंद्र च्या सहकार्याने बारामती नगरपरिषदेच्या ३७ आशा स्वयंसेविका व बारामती ग्रामीण मधील डोरलेवाडी, मेडद ,कटफळ या ठिकाणच्या ९ आशा स्वयंसेविका असे सर्व मिळून एकूण ४६ आशा स्वयंसेविकांना हेल्थ किटचे वाटप केले आहे. या हेल्थ किट मध्ये टेम्परेचेर गन, स्टीम वेपोरीजर, ऑक्सिमीटर, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर, पेरासिटमल टॅबलेट चा समावेश आहे.

   भारतीय संविधानाने सगळ्यांना आरोग्य पूर्ण जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. या मूलभूत अधिकारचे बीजारोपण अजून चांगल्या पद्धतीने होण्यासाठी  या किट चा वापर करता येईल. आशा  स्वयंसेविका  या प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रयत्नशील असतात. या अनुशंगाने  किट चा वापर करून  निरोगी जीवन देण्याचा प्रयत्न करतील असे मत अ‍ॅड. संजय नाळे यांनी व्यक्त केले.         

     बारामती भागातील  कोविड परिस्थिती विचारात घेता नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या होव्यात. व कोरोना परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात यावी हा उद्देश संस्थेचा आहे.या किटच्या वाटपा प्रसंगी कामगार हक्क अधिकार प्राप्ती हमी केंद्राचे केंद्रप्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लीगल (वकील) सेल चे उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय नाळे, केंद्र सहायक करण चव्हाण, हक्क अधिकार प्राप्ती  केंद्राचे स्वयंसेवक  दयावान दामोदरे, राणीताई गोसावी, काजल ताई खांडाळे त्याचबरोबर आरोग्य अधिकारी  डॉ.हेमंत नाझीरकर व आशा स्वयंसेविका प्रमुख करे मॅडम उपस्थित होत्या.