The Payment of Gratuity Act, 1972 उपदान देण्याचा कायदा, १९७२

ग्रॅच्युइटी (Gratuity) म्हणजे काय ? :

साध्या शब्दांत सांगायचे झाले तर कंपनीप्रती ठेवलेली निष्ठा व प्रामाणिकता म्हणजे ग्रॅच्युइटी (Gratuity). ग्रॅच्युइटी ही अशी रक्कम असते जी नियोक्ताद्वारे कर्मचार्‍यांना संस्थेत सेवा देण्यासाठी दिली जाते. ग्रॅच्युइटी (Gratuity) मिळवण्यासाठी सलग पाच वर्षे कंपनीत काम करावे लागते. कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ग्रॅच्युइटी पाच वर्षांआधी देखील देता येते.

कुणाला लागू होते ग्रॅच्युइटी (Gratuity) ? :

कारखाने, खाणी, तेल क्षेत्र, बागा, रेल्वे, दुकानं किंवा इतर संस्था ज्यांमध्ये १० किंवा यापेक्षा अधिक जण काम करतात, त्या संस्थेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू होते. 

ग्रॅच्युइटी (Gratuity) मिळवण्याचे निकष :

हा कायदा लागू करण्याचा मुख्य उद्देश सेवानिवृत्तीनंतर कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा आहे. सेवानिवृत्तीच्या नियमांनुसार किंवा शरीराचे महत्त्वपूर्व अंग निकामी झाल्यानं शारीरिक विकलांगतेच्या कारणामुळे सेवानिवृत्ती झाली असेल, तरी कामगारांना ग्रॅच्युइटी (Gratuity) लागू होते.

ग्रॅच्युइटी (Gratuity) रक्कम कशी काढली जाते :

कर्मचाऱ्याचा झालेली एकूण वर्षे  X १५ दिवसांचा मूळ पगार 

विविध महत्वाचे मुद्दे :

कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या समाप्तीनंतर ३० दिवसांमध्ये ग्रॅच्युइटी (Gratuity) दिली गेली पाहिजे. ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला तर व्याज आकारणी सुरू होते.

ग्रॅच्युइटीमधील २० लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त (Tax Free) आहे.

ग्रॅच्युइटी (Gratuity) कायद्याबाबत कामगारांना माहिती करून देणे, तसेच याबाबत सूचना फलक लावणे हि कंपनीची जबाबदारी आहे.

कामगार नामा Youtube चॅनल पाहण्यासाठी : क्लिक करा

कामगार विषयक बातम्या पाहण्यासाठी : क्लिक करा