मुंबई : दिनांक 11 जून रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर दुपारी 3.00 वाजता अतिशय महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा इमातीत मुंबई येथे विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांचे दालनात घेऊन खालील महत्त्वपूर्ण निर्देश मा.आयुक्त श्री. जी. श्रीकांत छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका यांना दिले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीधर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले होते. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद महानगरपालिकेतील १९०० कंत्राटी कर्मचारी बाबत विधानसभा उपाध्यक्ष श्री.अण्णासाहेब बनसोडे यांच्या दालनात त्यांनी बोलावलेल्या बैठकीत मा. उपाध्यक्ष यांनी दिलेले आदेश खालील प्रमाणे -
1 ) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून या महापालिकेने स्थानिक स्वराज्य संस्था यांचे किमान वेतन दराने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात द्यावे व ते त्यांच्या बँक खात्यामद्दे थेट जमा करावे असा महत्वपूर्ण आदेश त्यांनी यावेळी दिला.
2) ज्या कर्मचाऱ्यांची २४० दिवसापेक्षा जास्त काम करणार कर्मचारी यांची छाननी मा.उप कामगार आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी करावी तसेच औद्योगिक न्यायालयात न्यायासाठी प्रलंबित त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असल्यास त्यांना पूर्वत कामावर घ्यावे असे मा. उपाध्यक्ष विधानसभा यांनी निर्देश दिले.
3) महापालिकेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किमान वेतनाचे दराने वेतन ठेकेदारास द्यावे तो ठेकेदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे देण्यात आलेले किमान वेतन देतो का नाही हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे,प्रत्येक महिन्याला या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात का याचे बँक स्टेटमेंट अथवा पासबुक याची प्रत कंत्राटदाराने महापालिकेच्या संबंधित प्रशासनाला द्यावी, पालिका प्रशासनाने त्याची खात्री करून घ्यावी..
4 ) भविष्य निर्वाह निधी व ईएसआय ची रक्कम कंत्राटदार जमा करतो का याबाबतची देखील प्रत्येक महिन्याला माहिती महापालिका प्रशासनाने घ्यावी.
वरील आदेश उपाध्यक्ष यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष श्री.यशवंतभाऊ भोसले यांच्या मागणी वरून छत्रपती संभाजीनगर पालिका आयुक्त श्री जी श्रीकांत यांना या बैठकीत दिले.