"खाजगीकरणामुळे कामगार व ग्राहकांवर होणारे गंभीर परिणाम" यावरती आज ऑनलाईन व्याख्यान

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने, वीज वितरण, बँकिंग व इतर सार्वजनिक क्षेत्रात खाजगीकरणामुळे, "सर्वच क्षेत्रातील कामगार व ग्राहकांवर होणारे गंभीर परिणाम" यावरती आज १६ मे २०२१ रोजी विविध विषयांवर, प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे अशी माहिती असोसिएशन अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दिली.

सदर कार्यक्रम सर्व क्षेत्रातील कामगार व कामगार कुटुंबिये व पाल्ये यांचेसाठी असून याची वेळ आज (१६ मे २०२१) सायं. ७ ते ८.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे.

या व्याख्याना मध्ये प्रमुख व्यक्ते म्हणून मा.कृष्णाजी भोयर (महासचिव - महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन - AITUC / AEFEE), मा. विश्वास उटगी (बँकिंग तज्ञ व जेष्ठ कामगार नेते, सह निमंत्रक कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य), मा. गिरीष भावे (सदस्य - अखिल भारतीय कौन्सिल, लोकराज संघटना) हे मार्दर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी तात्यासाहेब भोसले - सोलापूर, भगवान पाटील- धुळे, शिवाजीराव इंगवले - सातारा, देवराव कोंडेकर - गडचिरोली, सुरेश केसरकर - कोल्हापूर, सुधीर मुंडे - बीड, नरेंद्र रहाटे - चंद्रपूर, अच्युतराव माने - उस्मानाबाद, दिलीप घोलप - पुणे, केरबा डावरे - ठाणे, दिलीप साटम - सिंधुदूर्ग, निलेश सोमाणी - वाशिम, प्रभाकर कांबळे - मुंबई, काशिनाथ जनगावे - लातूर, किशन शिरलेकर - परभणी, मारूती जाधव - नाशिक यांनी विशेष कष्ट घेतले असून याचे नियोजन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

कार्यक्रमास पुढील लिंकच्या माध्यमातून जाॅईन व्हावे (गुगल मीट अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करावे) :-

 https://meet.google.com/qio-vkxt-eqj