नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना अतिरिक्त प्रवास भत्ता द्या - महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघाची मागणी

पुणे : कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊन मध्ये कर्तव्यावर उपस्थित राहावे, यासाठी नोंदणीकृत सुरक्षारक्षक कामगारांना अतिरिक्त प्रवास भत्ता द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघाने पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळला एका निवेदनाद्वारे केली आहे.

     दरम्यान या निवेदनात पुढे असे नमूद केले आहे , पुणे  जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरात माहे ३ एप्रिल २०२१ पासून आहे. तरी या कालावधीत सात दिवस पूर्णपणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती, त्यानंतर माहे १५ एप्रिल नंतर अत्यावश्यक सेवेसाठी चालू केल्या, परंतु कोणतीही बस वेळेत मिळत नाही. मग त्या बसचा उपयोग काय? असा नाराजीचा सूर सुरक्षारक्षक कामगारांमध्ये आहे. 

तरी पुणे जिल्हा सुरक्षा मंडळातील सुरक्षारक्षक कामगार पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रवास करत असतात. तरी काही ठिकाणी पीएमपीएलच्या बस देखील वेळेवर मिळत नसतात, त्यामुळे सुरक्षारक्षक कामगाराला अशा वेळेस खाजगी वाहनातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याला आर्थिक आव्हानाला फार मोठे तोंड द्यावे लागत आहे. 

म्हणून पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळानी या निवेदनाची दखल घेऊन संबंधित पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक कामगारांना अतिरिक्त प्रवास भत्ता  त्वरित द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष  अविनाश मुंढे, जिल्हा सचिव अनिल पारधी, ग्रामीण सचिव ज्ञानेश्वर हिवराळे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष राजकुमार काळे यांनी एका निवेदनाद्वारे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळला केली आहे. दरम्यान या संबंधीच्या प्रत उपसचिव कामगार विभाग, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, सह आयुक्त कामगार माथाडी मुंबई, जिल्हाधिकारी  पुणे यांना दिल्या आहेत.