EPFO hikes death insurance Claim amount to 7 lakh for EDLI subscribers
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या या कठीण काळात भविष्य निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याअंतर्गत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) ट्रस्टी बोर्ड ने एम्प्लॉय डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम, १९७६ (EDLI Scheme, 1976) अंतर्गत विम्याची रक्कम ६ लाखांवरून ७ लाख रुपये केली आहे. दि.२८ एप्रिल २०२१ रोजी EDLI योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विमा रक्कम 7 लाखांपर्यंत वाढविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) ९ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत EDLI योजनेतील जास्तीत जास्त रकमेची वाढ ७ लाखांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तसेच कामगार आणि रोजगार मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२० रोजी एका अधिसूचनेद्वारे EDLI अंतर्गत किमान विमा रक्कम 2.5 लाख ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
एम्प्लॉय डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम (EDLI) स्कीम काय आहे
EDLI योजना, 1976-च्या च्या परिच्छेद -22(3) मधील दुरुस्तीचा उद्देश सेवेत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या योजनेतील सदस्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिलासा देण्याचा आहे. पूर्वी त्याची कमाल मर्यादा 6 लाख होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने घेतलेल्या निर्णयानंतर ती ७ लाख करण्यात आली आहे. किमान विमा रक्कम २.५ लाख रुपये १५ फेब्रुवारी २०२० पासून लागू आहे.
दि.२८ एप्रिल २०२१ रोजी EDLI योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विमा रक्कम 7 लाखांपर्यंत वाढविण्याच्या अधिसूचना पुढीलप्रमाणे (image वरती क्लिक करा.) :